Apple Airpods Pro (2nd Generation) वर Discount सुरू झाले आहे. तुम्हीही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण, सध्या त्यावर बंपर डिस्काउंट उपलब्ध करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हे महागडे उपकरण अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता. जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील.
मॅगसेफ चार्जिंग केस (USB-C) सह Apple AirPods Pro (2nd Generation) विजय सेल्समधून ऑर्डर केले जाऊ शकते. या डिवाइसची MRP 24,900 रुपये आहे आणि तुम्ही ती 6% डिस्काउंटनंतर 23,500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. वर सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला ही ऑफर केवळ विजय सेल्समध्ये मिळत आहे.
बँक ऑफर्स
या डिवाइसवर काही बँक ऑफर्सही स्वतंत्रपणे दिल्या जात आहेत. होय, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर नो कॉस्ट EMI पर्याय देखील तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबरच, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर 7.5% इन्स्टंट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, या अंतर्गत तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Apple Airpods Pro (2nd Generation)
Apple Airpods Pro (2nd Generation) च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात ऍडॉप्टिव्ह EQ देखील देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, H2 हेडफोन चिप देखील यामध्ये उपलब्ध आहे. तसेच, हे Airpods डस्ट, स्वेट आणि पाणी-प्रतिरोधक आहेत. जेणेकरून तुम्ही वर्कआऊट दरम्यान देखील त्यांचा वापर करू शकता. या एअरपॉड्सवर 1 वर्षाच्या वॉरंटी देखील उपलब्ध आहे. या बड्सची बॅटरी देखील अप्रतिम आहे, ज्यामुळे सिंगल चार्जवर 6 तास ऐकण्याची वेळ दिली जात आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile