Amazon Prime in India: प्राईमसह मिळवा धम्माल बेनिफिट्स! फास्टेस्ट डिलिव्हरी, मनोरंजनासह मिळेल बरेच काही
Amazon प्राईम आता भारतात एक वैशिष्ट्यपूर्ण सबस्क्रिप्शन सर्व्हिस बनली आहे.
सर्व Amazon Prime सदस्यांना किमान ऑर्डर मूल्याशिवाय मोफत डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध
Amazon Prime Video हा प्राईम सदस्यांसाठी सर्वात मोठा आणि आकर्षक बेनिफिट आहे.
Amazon Prime in India: आपणा सर्वांना माहीतीच आहे की, सध्या प्रत्येक दुसरा व्यक्ती प्रसिद्ध साईट Amazon चा वापर करतो. यासह प्राईम मेंबरशिप देखील दिली जाते, ज्यात युजरला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, अमेरिकेत दोन दिवसांची मोफत डिलिव्हरी सेवा म्हणून सुरू झालेली Amazon प्राईम आता भारतात एक वैशिष्ट्यपूर्ण सबस्क्रिप्शन सर्व्हिस बनली आहे.
सध्या Amazon Prime भारतीय ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार प्राइम, प्राइम लाइट आणि प्राइम शॉपिंग एडिशन सारखे प्लॅन पर्याय निवडण्याची संधी देते. या प्लॅन्ससह बचत, मनोरंजन, सुविधा आणि बऱ्याच सुविधा मिळतील. त्याबरोबरच, यासह मोफत एक दिवसीय डिलिव्हरी, प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम रीडिंग आणि एक्सक्लुझिव्ह डील्सचा देखील ऍक्सेस मिळतो.
एवढेच नाही तर, ग्राहकांना काही बँक कार्ड, नो-कॉस्ट EMI पर्याय, काही स्मार्टफोनवर फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळू शकतो. सदस्यत्व देण्याच्या एका दशकाहून अधिक काळात, टेक जायंटने या सदस्यत्वाची श्रेणी वाढवली आहे. लक्षात घ्या की, भारतीय बाजारपेठेला त्यांच्या स्थानिक गरजांनुसार काही खास फायदे मिळत आहेत. Amazon Prime मेंबरशिपच्या सर्व बेनिफिट्सची यादी पुढीलप्रमाणे:
जलद डिलिव्हरी (Faster deliveries)
इतरांना Amazon वर किमान ऑर्डर मूल्यशिवाय फ्री डिलेव्हरी ऑप्शन मिळत नाही. मात्र, सर्व Amazon Prime सदस्यांना किमान ऑर्डर मूल्याशिवाय मोफत डिलिव्हरीचा पर्याय दिला जातो. एवढेच नाही तर, ग्राहक त्यांच्या स्थानानुसार एक दिवसीय, दोन दिवसीय किंवा नियोजित डिलिव्हरी निवडू शकतात. जर तुम्हाला तुमची ऑर्डर त्याच दिवशी डिलिव्हरी हवी असेल, तर तुम्हाला प्राइम शॉपिंग एडिशनचा पर्याय देखील निवडता येईल.
5% कॅशबॅक
सर्व Amazon Prime सदस्यांना खरेदीवर अधिक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येईल. सदस्यांना Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून अमेझॉनवर केलेल्या खरेदीवर 5% कॅशबॅक मिळू शकतो. तुम्ही डिजिटल किंवा गिफ्ट कार्ड खरेदी करत असाल तेव्हाही, तुम्ही 2% परत मिळवू शकता.
आजच Amazon Prime मध्ये सामील होण्यासाठी आणि तुमची खरेदी अधिक स्मार्ट करण्यासाठी येथे टॅप करा.
Amazon Prime Video
Amazon Prime Video हा प्राईम सदस्यांसाठी सर्वात मोठा आणि आकर्षक बेनिफिट आहे. सिनेरसिकांना अमेझॉन प्राइम सदस्यत्वाचा भाग म्हणून विशेष बॉलीवूड आणि प्रादेशिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आस्वास घेता येईल. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही दोन टेलिव्हिजनसह पाच उपकरणांवर टीव्ही शो, प्राइम ओरिजिनल सिरीज, स्पोर्ट्स इ. कंटेंट मिळेल. याव्यतिरिक्त, प्राइम लाइटचे सदस्य जाहिरातींसह एकाच स्क्रीनवर HD कंटेंट पाहू शकतात.
प्राइम रीडिंग (Prime Reading)
जर तुम्ही एक उत्कृष्ट वाचक आहात तर तुमच्या सारख्या पुस्तकप्रेमींना बोनस म्हणून प्राइम रीडिंग देखील मिळू शकते. परंतु ही सुविधा केवळ संपूर्ण प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध आहे. सदस्यता घेणारे ग्राहक ई-पुस्तके, कॉमिक , मॅगझिन्स आणि इतर साहित्य उधार घेऊ शकतात.
Amazon Music
संगीत-प्रेमींसाठी देखील Amazon ने भारी सोय केली आहे. प्राइम सदस्यांना Amazon Music वर लाखो गाणी जाहिरातींशिवाय ऐकता येतील. महत्त्वाचे लक्षात घ्या की, अमेझॉन म्युझिक लाईट किंवा शॉपिंग एडिशन टियरमध्ये हे बेनिफिट उपलब्ध नसेल. या सुविधेचा लाभ बहुतकरून युजर्स प्रवासात संगीत ऐकण्यासाठी घेतात.
प्राइम गेमिंग (Prime Gaming)
सिनेरसिक, संगीत प्रेमींसारखीच Amazon ने गेमिंग लव्हर्ससाठी देखील बेनिफिट सादर केले आहे. प्राईम गेमिंगमध्ये तुम्हाला मासिक मोफत गेम, विशेष इन-गेम कंटेंट आणि बरेच काही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळणार आहे. हा फायदा देखील केवळ संपूर्ण प्राइम वापरकर्त्यांसाठी असणार आहे.
अर्ली ऍक्सेस आणि एक्सक्लुसिव्ह डील्स (Early Access and Exclusive Deals)
सर्व अमेझॉन प्राइम सदस्यांना एक्सक्लुसिव्ह डील्समध्ये लवकर ऍक्सेस मिळतो. हा लाभ विशेषतः सेल आणि फेस्टिवल सेल कार्यक्रमांमध्ये फायदेशीर आहे. या वेळी, प्राइम सदस्य इतर सामान्य लोकांसाठी डील्स उपलब्ध होण्यापूर्वी काही काळासाठी डील्सचा अर्ली ऍक्सेस मिळवू शकतात.
प्राईमचे फायदे (Prime Advantage)
प्राइम ऍडव्हांटेजबद्दल क्वचितच लोकांना माहिती आहे. हे एक आकर्षक फीचर आहे, जे सर्व प्राइम प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. ग्राहक स्मार्टफोन आणि इतर पात्र वस्तूंवर नो-कॉस्ट EMI मिळवून, तसेच अपघाती नुकसान झाल्यास 6 महिन्यांचे मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळवून याचा फायदा घेण्यास सक्षम असतील.
Amazon फॅमिली ऑफर्स
प्राईम सदस्यांना Amazon फॅमिली ऑफर्सचा ऍक्सेस मिळेल. यामध्ये विशेषतः क्युरेटेड डील आणि पाल्य असलेल्या कुटुंबांसाठी डिझाइन केलेल्या ऑफर्स आहे. जसे की, बेबी प्रोडक्ट्स, खेळणी आणि प्रोडक्ट्स समाविष्ट आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile