Smartphones Launch in May 2025: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार अनेक भारी स्मार्टफोन, Samsung, Realme फोन्स यादीत उपलब्ध 

HIGHLIGHTS

एप्रिलमध्ये मिड-रेंज सेगमेंटमध्ये अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत.

मे 2025 महिना देखील स्मार्टफोन्सच्या नावावर होणार आहे.

Samsung, iQOO इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स यादीत उपलब्ध

Smartphones Launch in May 2025: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार अनेक भारी स्मार्टफोन, Samsung, Realme फोन्स यादीत उपलब्ध 

Smartphones Launch in May 2025: मागील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये मिड-रेंज सेगमेंटमध्ये अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत. एकंदरीत एप्रिल महिना देखील स्मार्टफोन्सच्या नावावर झाला आहे. या महिन्यात Motorola Edge 60 Fusion, Motorola Edge 60 Stylus, CMF Phone 2 Pro, Realme Narzo 80 Pro, Vivo T4, Samsung Galaxy M56, iQoo Z10 आणि Realme 14T सारखे मॉडेल समाविष्ट आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व फोन मिड-बजेटमध्ये उपलब्ध आहेत. मे महिन्यात देखील अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जातील. पहा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Jio च्या धमाकेदार ऑफरच्या वैधतेत वाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत JioHotstar मिळेल Free

Samsung Galaxy S25 Edge

जानेवारीमध्ये म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला Samsung ने आपली Samsung Galaxy S25 सिरीज सादर केली. त्यासोबतच, कंपनीने Samsung Galaxy S25 Edge या नवीन मॉडेलची घोषणा केली. त्याबरोबरच, हा फोन मे महिन्यात भारतात लाँच होणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 13 मे रोजी जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. फोनमध्ये तुम्हाला 200MP प्रायमरी कॅमेरासह 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, समोर 12MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.

Realme GT 7

Realme चा गेमिंग फोन Realme GT 7 देखील मे महिन्यात भारतात लाँच होणार आहे. हा फोन कंपनीच्या मीडियाटेकच्या फ्लॅगशिप प्रोसेसर डायमेन्सिटी 9400 सीरीजसह सादर केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये समोर 16MP सेन्सर दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये मोठी 7200mAh टायटन बॅटरी मिळेल, तुम्हाला 100W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळू शकतो.

smartphones launch in may 2025

Motorola Razr 60 Ultra

Motorola Razr 60 Ultra जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. हा फोन मे महिन्यात भारतात लाँच होणार आहे. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह सादर करेल. लीकनुसार, फोटोग्राफीसाठी यात OIS सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, 50MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, Motorola Razr 60 Ultra मध्ये 4,700mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

iQOO Neo 10

मे महिन्यात भारतात IQOO चा नवीन फोन लाँच होणार आहे. कंपनी IQOO Neo 10 स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K डिस्प्ले आहे, जो 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Neo 10 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आणि 8MP चा सेकंडरी अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo