Haier C90 आणि C95 OLED Google TV सिरीज भारतात लाँच, घरीच मिळेल सिनेमा थिएटरसारखी मज्जा! 

HIGHLIGHTS

Haier ने भारतात आपली नवीन Haier C90 आणि C95 OLED टीव्ही लाँच केले.

Haier ने या टीव्हीसोबत सोलर रिमोट कंट्रोल दिला आहे.

Haier च्या या दोन्ही टीव्ही मॉडेल्सची विक्री भारतात सुरू झाली आहे.

Haier C90 आणि C95 OLED Google TV सिरीज भारतात लाँच, घरीच मिळेल सिनेमा थिएटरसारखी मज्जा! 

प्रसिद्ध टेक दिग्गज Haier ने भारतात आपली नवीन Haier C90 आणि C95 OLED टीव्ही सिरीज लाँच केली आहे. हायर C90 सिरीज अंतर्गत, कंपनीने 55 इंच, 65 इंच आणि 77 इंच असे 3 स्क्रीन साइज सादर केले आहेत. त्याबरोबरच, हायर C95 सिरीज अंतर्गत 55 इंच आणि 65 इंच असे दोन स्क्रीन साइज सादर करण्यात आले आहेत. कंपनीने ही नवीन सिरीज अशा प्रेक्षकांसाठी सादर केली आहे, ज्यांना हाय-एंड फीचर्स असलेले मोठ्या स्क्रीनचे टीव्ही हवे आहेत. जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: दीर्घ बॅटरी लाईफसह Lava Yuva Star 2 भारतात लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

Haier C90 आणि C95 OLED TV

Haier कंपनीने Haier C90 सिरीजची किंमत 1,29,990 रुपयांपासून सुरू केली आहे. त्याबरोबरच, Haier C95 OLED TV ची किंमत 1,56,990 रुपयांपासून सुरू होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही टीव्ही मॉडेल्सची विक्री भारतात सुरू झाली आहे, जी तुम्ही कंपनीच्या साइट आणि इतर आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यास सक्षम असाल.

smart tv

Haier C90 आणि C95 OLED TV चे सर्व तपशील

Haier कंपनीने Haier C90 सिरीज 55 इंच, 65 इंच आणि 77 इंच अशा तीन स्क्रीन साईजमध्ये सादर केली आहे. तर, Haier C95 मालिका 55 इंच आणि 65 इंच अशा दोन स्क्रीन आकारांमध्ये सादर केली आहे. हे दोन्ही टीव्ही OLED पॅनेलने सुसज्ज आहेत. त्यांच्यासोबत Dolby Vision IQ आणि HDR10+ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. दोन्ही टीव्हीमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी MEMC म्हणजेच मोशन एस्टीमेशन, मोशन कॉम्पेन्सेशन आहे.

याव्यतिरिक्त, या गुगल टीव्हीमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतात. तुम्ही तुमच्या आवाजानेही हे टीव्ही नियंत्रित करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, HICST आणि क्रोमकास्ट सपोर्ट देखील उपलब्ध आहे. हे दोन्ही टीव्ही साउंडच्या बाबतीत एकमेकांपासून वेगळे आहेत. C95 मॉडेल्समध्ये Harman Kardon ने सुसज्ज 50W साउंड सिस्टम आहे, ज्यामध्ये Dolby Atmos ला सपोर्ट आहे. त्याबरोबरच, C90 च्या 77-इंच मॉडेलमध्ये 65W साउंड आउटपुट आहे. कंपनीने या टीव्हीसोबत सोलर रिमोट कंट्रोल दिला आहे. तुम्ही ते USB Type-C द्वारे देखील चार्ज करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo