दीर्घ बॅटरी लाईफसह Lava Yuva Star 2 भारतात लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी
Lava चा नवा Lava Yuva Star 2 स्मार्टफोन भारतात लाँच
Lava चा हा फोन कंपनीने अगदी बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.
फोटोग्राफीसाठी Lava Yuva Star 2 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
एकमेव देशी कंपनी Lava चा नवा Lava Yuva Star 2 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो लावा युवा स्टारचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. हा फोन कंपनीने अगदी बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.75 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी भारी कॅमेरा देखील यात उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Lava Yuva Star 2 ची किंमत आणि तपशील-
SurveyAlso Read: तब्बल 6000mAh बॅटरीसह Realme C75 5G फोन भारतात लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत
Lava Yuva Star 2 ची किंमत
Lava कंपनीने Lava Yuva Star 2 हा फोन 6,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. हा फोन रेडियंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आयव्हरी या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ऑफलाइन खरेदी करण्यास सक्षम असाल. याशिवाय, कंपनी फ्री Service@Home प्रोग्राम अंतर्गत मोफत after-sales सपोर्ट देखील देत आहे.

Lava Yuva Star 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva Star 2 मध्ये 6.75 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन युनिसॉक प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 64GB स्टोरेज आहे. तसेच, फोन अँड्रॉइड 14 गो वर कार्य करतो. सुरक्षेसाठी, या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि AI सक्षम सेन्सर आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. एकदा चार्ज केल्यावर हा फोन बराच काळ टिकणार आहे. फोनच्या मागील बाजूस चमकदार डिझाइन देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile