iQOO Neo 10 चे भारतीय लाँच कन्फर्म! आगामी स्मार्टफोन पॉवर पॅक्ड फीचर्ससह सुसज्ज 

HIGHLIGHTS

लवकरच iQOO Neo 10 भारतात लाँच केला जाईल.

हा आगामी स्मार्टफोन iQOO च्या Neo 10 सिरीजचा भाग आहे.

मार्च महिन्यात iQOO Neo 10R फोन लाँच करण्यात आला होता.

iQOO Neo 10 चे भारतीय लाँच कन्फर्म! आगामी स्मार्टफोन पॉवर पॅक्ड फीचर्ससह सुसज्ज 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा आगामी स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. होय, लवकरच iQOO Neo 10 भारतात आहे. हा आगामी स्मार्टफोन iQOO च्या Neo 10 सिरीजचा भाग आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची टीजिंग देखील सुरू झाली आहे, ज्यामुळे तो ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वरून व्रिकीसाठी उपलब्ध होईल, असे समजते. यासोबतच हँडसेटचा रंग आणि कॅमेरा देखील समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी iQOO Neo 10 चे संपूर्ण तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Samsung New Smart TV: सॅमसंगने लाँच केले 65 इंचपर्यंत लांबीचे स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत

iQOO Neo 10 भारतीय लॉन्चिंग

प्रसिद्ध टेक दिग्गज iQOO च्या प्रमुख निपुण मार्या यांनी शेअर केलेल्या टीझरमध्ये iQOO Neo 10 भारतात लाँच होणार असल्याची पुष्टी झालेली आहे. टिझरनुसार हे डिव्हाइस नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या संयोजनासह येणार असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच, फोनच्या डिझाईनमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय, हँडसेटशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही. महत्त्वाचे लक्षात घ्या की, iQOO Neo 10 ची भारतीय लॉन्चिंग तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

iqoo neo 10

iQOO Neo 10 चे अपेक्षित तपशील

आगामी iQOO Neo 10 बद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. जर अलीकडील मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर, आगामी iQOO Neo 10 मध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले असू शकतो. या डिव्हाइसमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स असण्याची अपेक्षा आहे. हा फोन नवीनतम अँड्रॉइड 15 वर काम करेल. पॉवर बॅकअपसाठी, यात जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 7000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. मात्र, फोनचे योग्य आणि कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

iQOO Neo 10R

अलीकडेच म्हणजेच मार्च महिन्यात iQOO Neo 10R फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मिड बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन आहे. याफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. त्याची बॅटरी 6400mAh आहे. यात 80W फास्ट चार्जिंग आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo