Lava Days Sale: देशी कंपनीची सेल सुरु, बेस्टसेलर फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा Discount 

HIGHLIGHTS

Lava ने आजपासून Lava Days Sale ची घोषणा केली आहे.

ही सेल आज म्हणजेच 23 एप्रिलपासून सुरू होईल आणि 27 एप्रिलपर्यंत लाईव्ह असेल.

Lava Agni 3, Lava O3, और Lava O3 Pro सारख्या निवडक स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट

Lava Days Sale: देशी कंपनीची सेल सुरु, बेस्टसेलर फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा Discount 

भारतातील एकमेव प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Lava International Limited ने आजपासून Lava Days Sale ची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सेल आज म्हणजेच 23 एप्रिलपासून सुरू होईल आणि 27 एप्रिलपर्यंत Amazon वर लाईव्ह असणार आहे. या सेलदरम्यान Lava Agni 3, Lava O3, और Lava O3 Pro सारख्या निवडक स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: iQOO Z10 Turbo सिरीजबद्दल महत्त्वाची माहिती उघड, मिळतील जबरदस्त फीचर्स

Lava Agni 3 वरील ऑफर्स

सेलदरम्यान, ग्राहकांना Lava Agni 3 च्या 8GB+128GB आणि 8+256GB व्हेरिएंटवर 3000 रुपयांची फ्लॅट कूपन सूट मिळू शकते. त्याबरोबरच, या कालावधीत, HDFC आणि Axis बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 2000 रुपयांची कूपन सूट आणि 2000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध असेल. ज्यामुळे या फोनवर एकूण 4000 रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

lava days sale

Lava O3, Lava O3 Pro

या सेलदरम्यान, ग्राहकांना कूपनद्वारे Lava O3 च्या 4GB+ 64GB व्हेरिएंटवर 300 रुपयांची सूट मिळेल, या सवलतीसह हा फोन 5,899 रुपयांपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध होईल. दुसरीकडे, 3GB+64GB व्हेरिएंटवर कूपनद्वारे 150 रुपयांची सूट मिळेल, या सवलतीसह हा फोन 5,649 रुपयांना खरेदी करता येईल.

याव्यतिरिक्त, 23 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान, ग्राहकांना कूपनद्वारे Lava O3 Pro च्या 4GB+ 128GB व्हेरिएंटवर 300 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे हा फोन तुम्हाला 6,699 रुपयांना खरेदी करता येईल.

Lava Agni 3 चे मुख्य तपशील

मुख्य तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, Lava Agni 3 मध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K 3D कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 1.74-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300X प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर कार्य करतो.या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP सोनी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAH बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo