Price Drop! लेटेस्ट OnePlus 13 च्या किमतीत तब्बल 9000 रुपयांची घसरण, पहा Best ऑफर्स
OnePlus ने जानेवारीमध्ये OnePlus 13 फोन भारतात लाँच केला.
OnePlus 13 फोन लाँच किमतीपेक्षा तब्बल 9,000 रुपयांनी स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध
धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68+ IP69 रेटिंग देण्यात आले आहे.
फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध OnePlus ने जानेवारीमध्ये OnePlus 13 फोन भारतात लाँच केला होता. सध्या वर्षातील सर्वात मोठी सवलत OnePlus 13 वर उपलब्ध करून दिली जात आहे. हा फोन लाँच किमतीपेक्षा तब्बल 9,000 रुपयांनी स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Oneplus च्या अधिकृत साईटवर ही सवलती सूचिबद्ध करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus 13 ची किंमत आणि ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात ऑफर्स-
SurveyAlso Read: Finally! मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Oppo K13 5G अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स
OnePlus 13 ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 13 या वर्षी भारतात 69,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. परंतु, 12GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटवर 5000 रुपयांची सूट मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना बँक ऑफरमध्ये HDFC बँकेच्या डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4000 रुपयांची सूट मिळू शकते. दुसरीकडे, एक्सचेंज ऑफर्सचा लाभ देखील मिळेल. त्यानुसार, या फोनवर सध्या लाँच किमतीपेक्षा एकूण 9000 रुपयांची बचत होईल.

OnePlus 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 13 मध्ये 6.82-इंच लांबीचा क्वाड HDPlus LTPO 4.1 ProXDR डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, यामध्ये 4,500 nits पीक ब्राइटनेस आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर कार्य करतो. सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68+ IP69 रेटिंग देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, OnePlus 13 च्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP Sony LYT-808 प्राथमिक सेन्सर, 50MP S5KJN5 अल्ट्रावाइड सेन्सर आणि 50MP Sony LYT-600 पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, GPS आणि NFC सपोर्ट यांचा समावेश आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile