Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स, एकापेक्षा एक पर्याय 

HIGHLIGHTS

या महिन्याच्या सुरुवातीलाच Vivo चा Vivo V50e लाँच झाला आहे.

Samsung चा Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोन 17 एप्रिल रोजी लाँच होणार

Motorola, Redmi,इ . टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट

Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स, एकापेक्षा एक पर्याय 

Smartphones Launch This Week: एप्रिल महिना सुरु होताच स्मार्टफोन लाँचच्या नावावर झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या महिन्याच्या सुरुवातीलाच शीर्षस्थानी असलेल्या ब्रँड Vivo चा Vivo V50e लाँच करण्यात आला आहे. आता पुढच्या आठवड्यात मोटोरोलासह अनेक टेक कंपन्या त्यांचे मोबाईल फोन लाँच करणार आहेत. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला 5G स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे या महिन्यात भारतात दाखल होणार आहेत. Motorola, Redmi, इ . टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Motorola Edge 60 stylus

Motorola Edge 60 stylus फोनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. हा फोन या महिन्याच्या 15 तारखेला लाँच होईल. आगामी फोनच्या अपेक्षित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा मोबाईल फोन 6.7 इंच लांबीच्या pOLED डिस्प्लेसह येईल. जलद काम करण्यासाठी, या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 चिप आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असेल. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा देखील उपलब्ध असेल. फोनचे कन्फर्म स्पेक्स तर लाँचनंतरच पुढे येतील.

Motorola Edge 60 stylus (smartphones launch this week)

Redmi A5

Redmi A5 च्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन 16 एप्रिल रोजी भारतात लाँच करण्यात येईल. या हँडसेटमध्ये Redmi A5 च्या 4G व्हेरिएंटची फीचर्स आढळू शकतात, असे बोलले जात आहे. त्यानुसार, फोनच्या अपेक्षित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.88 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले असेल. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर दिला जाईल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 32MP चा बॅक कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा असेल.

Samsung Galaxy M56 5G

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोन 17 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या फोनच्या अपेक्षित स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्हाइस अँड्रॉइड 15 सह कार्य करेल. तसेच, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट HD डिस्प्ले मिळेल, ज्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ ग्लास बसवला जाईल. या फोनमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळू शकतो. फोनची इतर माहिती लाँचनंतरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo