ऐकावं ते नवलच! म्हणे सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी Smartwatch भारतात लाँच, किंमत तर… 

HIGHLIGHTS

Garmin Instinct 3 सिरीज भारतात लाँच झाली आहे.

Garmin Instinct 3 मजबूत वॉच MIL-STD 810 स्टॅंडर्डसह येते.

विशेष म्हणजे या स्मार्टवॉटचमध्ये सोलर चार्जिंगसारखे वैशिष्ट्ये मिळतील.

ऐकावं ते नवलच! म्हणे सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी Smartwatch भारतात लाँच, किंमत तर… 

प्रसिद्ध टेक निर्माता Garmin जबरडस्ट वेअरेबल देण्यासाठी प्रसिद्ध आहे. Garmin Instinct 3 सिरीज भारतात लाँच झाली आहे. ही कंपनीची मजबूत Smartwatch सिरीज आहे, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या स्मार्टवॉटचमध्ये सोलर चार्जिंगसारखे वैशिष्ट्ये मिळतील. होय, फीचरच्या नावाप्रमाणे हे स्मार्टवॉच सूर्यप्रकाशाने चार्ज होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Garmin Instinct 3 घड्याळाची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Realme Gaming Phones: जबरदस्त फोन्सवर मिळतायेत गोल्डन डील्स! मोठ्या डिस्काउंटसह खरेदीची संधी

Garmin Instinct 3 ची किंमत

लेटेस्ट Garmin Instinct E स्मार्टवॉचची किंमत 35,990 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. त्याबरोबरच, गार्मिन इन्स्टिंक्ट 3 ची किंमत 46,990 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही स्मार्टवॉच गार्मिन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करण्यास सक्षम असाल. ही वॉच निवडक प्रीमियम रिटेल स्टोअर्समधून देखील खरेदी करता येईल.

Garmin Instinct 3 SMARTWATCH

Garmin Instinct 3 चे तपशील

Garmin Instinct 3 वॉच ब्लॅक, ब्लॅक/चार्कोआ आणि निओट्रॉपिक आणि निओट्रॉपिक/ट्वायलाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. Garmin Instinct 3 स्मार्टवॉचमध्ये AMOLED आणि सोलर डिस्प्ले देण्यात आले आहे. लक्षात घ्या की, AMOLED डिस्प्लेमध्ये 24 तासांपर्यंत चालणारी बॅटरी आहे. तर, सोलर वर्जनद्वारे, हे उपकरण सूर्यप्रकाशात अमर्यादित वापर देतो.

महत्त्वाचे म्हणजे ही वॉच MIL-STD 810 स्टॅंडर्डसह येते. ज्यामध्ये थर्मल, शॉक आणि वॉटर रेझिस्टन्स उपलब्ध असतील. त्याबरोबरच, पाण्यात ही वॉच 100 मीटरपर्यंत कार्य करेल. ही वॉच विशेषतांनी परिपूर्ण आहे. ही वॉच मल्टी-बँड GPS आणि SatIQ तंत्रज्ञानासह येते. तसेच यात, ABC सेन्सर म्हणजेच अल्टीमीटर, बॅरोमीटर, कंपास इ. आहेत. या स्मार्टवॉचला LED फ्लॅशलाइट देण्यात आला असून यात रेड लाईट मोड देखील आहे.

एवढेच नाही तर, स्मार्ट कनेक्टिव्हिटीसाठी, यात स्मार्ट नोटिफिकेशन्स आणि टू-वे मेसेजिंग सिस्टम गार्मिन मेसेंजरचा देखील सपोर्ट आहे. ही स्मार्टवॉच अनेक हेल्थ फीचर्ससह येते. हेल्थ फीचर्ससह यात फिटनेस ट्रॅकिंगसाठी देखील उत्तम सिस्टम आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo