Finally! गेमिंग लव्हर्ससाठी iQOO Neo 10R फोन अखेर भारतात लाँच, गेमिंगदरम्यान तासनतास टिकेल बॅटरी
iQOO चा iQOO Neo 10R फोन अखेर भारतीय बाजारात लाँच
हा नवा गेमिंग स्मार्टफोन आहे, जो मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा iQOO Neo 10R फोन अखेर भारतीय बाजारात लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता कंपनीने हा फोन भारतात दाखल केला आहे. लक्षात घ्या की, हा नवा गेमिंग स्मार्टफोन आहे, जो मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसारखे पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iQOO Neo 10R ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
SurveyiQOO Neo 10R ची किंमत आणि प्री-बुकिंग
iQOO Neo 10R फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे, जी फोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, फोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज पर्याय देखील आहे, ज्याची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. यात 12GB रॅम+ 512GB स्टोरेज मिळेल, ज्याची किंमत 28,999 रुपये इतकी आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची प्री-बुकिंग आज 11 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता सुरू झाली आहे. हा फोन रेजिंग ब्लू आणि मूननाइट टायटॅनियम या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
iQOO Neo 10R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 10R फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. हा फोन अँड्रॉइड 15 आधारित फनटच OS 15 वर कार्य करेल. पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP65 रेटिंग मिळाले आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. त्याबरोबरच, हा 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा सर्वोत्तम आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6400mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile