Nothing Phone (3a) Sale: पहिल्या सेलमध्ये लेटेस्ट फोनवर धमाकेदार Discount, जबरदस्त ऑफर्स
Nothing ने अलीकडेच भारतीय बाजारात Nothing Phone (3a) सिरीज लाँच केली.
आज भारतात पहिल्यांदाच Nothing Phone 3a सिरीज विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Nothing च्या या फोनमध्ये नथिंगचे आयकॉनिक Glyph लाईट उपलब्ध आहे.
Nothing Phone (3a) Sale: Nothing ने अलीकडेच भारतीय बाजारात Nothing Phone (3a) सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Pro भारतात सादर केले आहेत. आज भारतात पहिल्यांदाच Nothing Phone 3a सिरीज विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोन लाइनअपची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाईव्ह केली जाणार आहे. या काळात हा फोन मोठ्या सवलती आणि परवडणाऱ्या EMI वर खरेदी करता येतील.
SurveyAlso Read: Realme P3 Ultra Launch: मोठ्या बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार भारी फोन, किती असेल किंमत?
विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing च्या या फोनमध्ये नथिंगचे आयकॉनिक Glyph लाईट देण्यात आले आहेत. याशिवाय, दोन्ही डिव्हाइसेसमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी जलद चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. पहा किंमत आणि सेल ऑफर्स-

Nothing Phone (3a) सिरीजची किंमत आणि सेल ऑफर्स
Nothing Phone (3a) च्या 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तर, फोनचा 8GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, Nothing Phone (3a) Pro चा 8GB+ 128GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांना आणि 12GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांना खरेदी करता येईल.
फोनमधील पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही उपकरणांवर 2500 रुपयांची सूट आणि 1665 रुपयांचा EMI दिला जात आहे. यावर एक्सचेंज ऑफर मिळेल. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Nothing Phone (3a) सिरीजचे फीचर्स आणि स्पेक्स
डिस्प्ले
Nothing Phone (3a) सिरीजच्या दोन्ही फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेवर पांडा ग्लास देखील बसवण्यात आला आहे. या स्मार्टफोन्ससह IP64 रेटिंग देखील मिळाले आहे.
प्रोसेसर
उत्तम कार्य, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 7s Gen 3 उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, नथिंग फोन 3A मध्ये 50MP मेन, 8MP अल्ट्रा वाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. तर, 3a प्रो फोनमध्ये 50MP सोनी LYT-600 3x पेरिस्कोप लेन्स आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, दोन्ही फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
बॅटरी
Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Pro फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासह 50W वायर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या हँडसेटमध्ये 5G, 4G VoLTE, WiFi, GPS, ब्लूटूथ, NFC आणि USB टाइप-C पोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile