लेटेस्ट महागड्या OnePlus फोनवर तब्बल 5000 रुपयांचा Discount, ‘या’ सेलदरम्यान हजारो रुपयांची बचत
जानेवारी महिन्यात OnePlus 13 5G आणि OnePlus 13R स्मार्टफोन्स लाँच झाले.
Amazon Red Rush Days सेलदरम्यान OnePlus 13 5G फोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर मिळत आहे.
OnePlus 13 5G फोनवर हजारो रुपयांची बचत करण्याची संधी
प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर असलेल्या OnePlus कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात OnePlus 13 5G आणि OnePlus 13R स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Amazon Red Rush Days Sale सुरु आहे. या सेलदरम्यान OnePlus 13 5G फोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर मिळत आहे. सेलदरम्यान तुम्हाला या फोनवर हजारो रुपयांची बचत करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus 13 5G वरील सर्व ऑफर्स-
SurveyAlso Read: Poco M7 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आज, 50MP कॅमेरासह घ्या कडक फोटोज
OnePlus 13 5G ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 13 फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या Amazon रेड रश डेज सेल दरम्यान हा फोन स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनचे पेमेंट व्यवहार केल्यास या फोनवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, या फोनवर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्ससारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

OnePlus 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 13 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा QHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, ते अँड्रॉइड 15 आधारित ऑक्सिजन OS 15 सह येते. हे 4 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी पॅच अपडेट्स देते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम+ 256GB स्टोरेज, 16GB रॅम + 512GB स्टोरेज आणि 24G रॅम + 1TB स्टोरेजचा पर्याय आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 13 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा सोनी LYT-808 प्रायमरी कॅमेरा आहे. यामध्ये 50MP सोनी LYT-600 टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile