भारीच की! लेटेस्ट Nothing Phone (3a) सिरीजवर होईल हजारो रुपयांची बचत, पहा खात्रीची ऑफर
Nothing ने या आठवड्याच्या सुरुवातीला Nothing Phone (3a) सिरीज लाँच
सिरीजअंतर्गत फोन (3a) आणि फोन (3a) प्रो समाविष्ट आहेत.
Flipkart वर नथिंग फोन (3a) सिरीजसाठी एक नवीन एक्सचेंज प्रोग्राम जाहीर केला आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing ने या आठवड्याच्या सुरुवातीला भारत आणि जागतिक बाजारपेठेत आपला नवा Nothing Phone (3a) सिरीज लाँच करण्यात आली. या सिरीजअंतर्गत फोन (3a) आणि फोन (3a) प्रो समाविष्ट आहेत. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असणारे हे पहिले Nothing चे स्मार्टफोन्स आहेत. लक्षात घ्या की, नव्या स्मार्टफोनची सेल होण्यपूर्वी प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर नथिंग फोन (3a) सिरीजसाठी एक नवीन एक्सचेंज प्रोग्राम जाहीर केला आहे. पाहुयात सविस्तर माहिती-
SurveyAlso Read: Xiaomi Holi Sale: होळीला घ्या नवा जबरदस्त फोन! 200MP कॅमेरासह येणाऱ्या फोनवर धमाकेदार Discount
Nothing Phone (3a) सिरीजची किंमत
Nothing Phone (3a) च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये, तर फोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. दुसरीकडे, या फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किमत 29,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनवर बँक ऑफरमध्ये 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच, नो कॉस्ट EMI चा पर्याय सुद्धा मिळेल.

Nothing Phone (3a) सिरीज Flipkart एक्सचेंज प्रोग्राम
Nothing Phone (3a) सिरीज भारतात 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर उपलब्ध होईल. यासह, फ्लिपकार्टने ‘गॅरंटीड एक्सचेंज व्हॅल्यू’ प्रोग्रामची घोषणा केली आहे. हा प्रोग्राम सेलच्या पहिल्या दिवशी फोन (3a) सिरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइस असलेले ग्राहक त्यांचे फोन पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यूस अपग्रेड करण्यास सक्षम असतील.
Flipkart एक्सचेंज प्रोग्राम कसे कार्य करेल?
Flipkart च्या गॅरंटीड एक्सचेंज व्हॅल्यू ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना Nothing Phone (3a) सिरीज खरेदी करताना ‘Buy With Exchange’ ऑप्शन सिलेक्ट करा. येथे ‘No questions asked’ अंतर्गत उपलब्ध मॉडेल्सच्या यादीतून त्यांचे डिव्हाइस निवडून पुष्टी करा. एकदा निवडल्यानंतर खात्रीशीर विनिमय मूल्य आपोआप लागू होईल आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता.
डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह (विशमास्टर) डायग्नोस्टिक्स ऍपद्वारे डिव्हाइसचा ब्रँड आणि मॉडेल व्हेरिफाय करेल. फ्लिपकार्ट म्हणते की, होम डिलिव्हरीच्या वेळी डिव्हाइसच्या स्थितीनुसार कोणतेही अतिरिक्त मूल्यांकन किंवा कपात केली जाणार नाही. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर 2021 किंवा त्यानंतर लाँच झालेल्या OnePlus, Samsung आणि Nothing च्या स्मार्टफोन्सवर आणि 2019 आणि त्यानंतर लाँच झालेल्या Apple मॉडेल्सवर लागू आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile