फक्त एक कॉल आणि पैसा गायब! काय आहे कॉल मर्जिंग Scam? नव्या स्कॅमपासून कसे राहाल सुरक्षित? 

HIGHLIGHTS

सध्या कॉल मर्जिंग Scam ची चर्चा सर्वत्र सुरु ऐकायला मिळत आहे.

NPCI ने देखील या घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे.

काय आहे कॉल मर्जिंग स्कॅम आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय

फक्त एक कॉल आणि पैसा गायब! काय आहे कॉल मर्जिंग Scam? नव्या स्कॅमपासून कसे राहाल सुरक्षित? 

आजकाल जिकडे तिकडे सामान्य जनता ऑनलाईन फसवणूक, घोटाळे इ. चा बळी ठरत आहे. त्यामध्ये सरकारने आता प्रत्येक ठिकाणी स्कॅमपासून सावध राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तरीही वेगवेगळे नवनवीन स्कॅम बाजारात येत आहेत. सध्या कॉल मर्जिंग Scam ची चर्चा सर्वत्र सुरु ऐकायला मिळत आहे. होय, फक्त एका कॉलद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: मस्तच! दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात Vivo T4x 5G लाँच, स्वस्तात कॅमेरासह मिळेल रिंग लाईट

नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने देखील या घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात कॉल मर्जिंग स्कॅम आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय-

काय आहे Call Merging Scam?

वर सांगितल्याप्रमाणे, नुकतेच NPCI ने या नव्या स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. होय, NPCI ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत नव्या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सध्या एक नवीन घोटाळा सुरू झाला आहे.

call merging scam (image credit: pexels.com)

यामध्ये स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या ओळखीचे कोणीतरी आहेत, असा दावा करतात. ते मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आहेत, असे सांगतात. पुढे ज्या मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने तुमचा नंबर दिला होता, त्याच व्यक्तीकडून तुम्हाला फोन येत ते असे सांगून आता ते तुम्हाला कॉल्स लवकर मर्ज करण्यास सांगतील.

लक्षात घ्या की, हा कॉल तुमच्या कोणत्याही मित्राचा नसेल तर तो व्हॉइस OTP कॉल असणार आहे. तुम्ही कॉल्स मर्ज करताच, स्कॅमरला OTP ऐकू येईल. त्यानंतर तुम्हाला काय सुरु आहे, हे समजण्याच्या आत स्कॅमरद्वारे तुमचे बँक खाते रिकामे झालेले असेल.

नव्या Scam पासून कसे राहाल सुरक्षित?

  • या नवीन घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल इतर नंबरवरून येणारे कॉल मर्ज करणे टाळा.
  • कॉल वर असताना तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून कॉल येत असल्याची खात्री केल्याशिवाय अजिबात कॉल मर्ज करू नका.
  • तुम्हाला आलेला कॉल तुमच्या ओळखीचा आहे आणि सुरक्षित आहे, हे तपासून घ्या.
  • बँकेतून कॉल आलेला आहे असे जर सांगितले गेले तर, त्याची खरी ओळख पटवून घेण्याचे काम सर्वप्रथम करा.
  • महत्त्वाचे लक्षात घ्या की, कोणीही बँकेतून फोन केले असल्यास ते तुमचा बँक OTP कधीही विचारणार नाही. जर असे घडत असेल तर, ते एक स्कॅम असू शकते. त्यामुळे सावधान रहा आणि सुरक्षित रहा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo