Ayushyman Card: तब्बल 5 लाखांपर्यंत इलाज मोफत! काय आहे सरकारची योजना? कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोपी प्रोसेस आणि लाभ
भारत सरकारकडून आयुष्मान भारत योजना सुरु आहे.
Ayushyman Card द्वारे 5 लाखापर्यंत तुमच्या उपचाराचा खर्च मोफतमध्ये होईल.
जाणून घ्या Ayushyman Card डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि फायदे
आपण जिकडे तिकडे Ayushyman Card बद्दल ऐकत असतो. असे म्हणतात की, हा कार्ड बनवल्यावर तुमचे उपचाराचा खर्च 5 लाखापर्यंत मोफतमध्ये होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, देशातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी, भारत सरकारकडून आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत, आयुष्मान कार्डधारकांना तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा मिळतात.
Surveyआता या योजनेअंतर्गत, 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतील. विशेष म्हणजेच वृद्धांची आर्थिक परिस्थिती कशीही असो, ते सर्व या योजनेचा लाभ गेहण्यास सक्षम आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे.
Ayushyman Card ऑनलाईन डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया
PMJAY योजनेद्वारे कॅशलेस, पेपरलेस आणि पोर्टेबल व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड असते. सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तुम्हाला हे कार्ड दाखवावे लागेल. आयुष्मान भारत योजना गोल्डन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा:
- सर्वप्रथम PMJAY ची अधिकृत वेबसाइट (https://bis.pmjay.gov.in/BIS/mobileverify) ओपन करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने लॉग इन करा.
- OTP जनरेट करण्यासाठी ‘कॅप्चा कोड’ एंटर करा. आता HHD कोडचा पर्याय निवडा.
- कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला HHD कोड द्या, जिथे ते HHD कोड आणि इतर तपशील तपासले जातील.
- यानंतर, आयुष्मान मित्र म्हणून ओळखले जाणारे CSC प्रतिनिधी उर्वरित प्रक्रिया पूर्ण करतील. लक्षात घ्या की, आयुष्मान भारत कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला केवळ 30 रुपये द्यावे लागतील. यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचे दस्तऐवज देखील असावेत. म्हणजेच ओळख आणि वयाचा पुरावा (आधार कार्ड/पॅन कार्ड), तुमचा मोबाईल नंबर, ईमेल पत्ता आणि राहण्याचा पत्ता, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि सध्याच्या कुटुंबाची स्थिती दर्शविणारा कोणताही दस्तऐवज इ. हवेत.
Ayushyman Card चे लाभ
Ayushyman Card लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील. ही भारत सरकारद्वारे वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांचे कव्हर मिळेल. याद्वारे खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करता येतील.
- याद्वारे लाभार्थ्यांना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा मिळेल. 3 दिवसांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा कव्हरेज (औषध किंवा निदान).
- रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांचा कव्हरेज म्हणेजच यात औषध किंवा निदान येतील.
- देशभरातील कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात या सेवांचा लाभ घेता येईल.
- पहिल्या दिवसापासून सर्व पूर्व-अस्तित्वात असलेल्या आजारांचे कव्हरेज. या योजनेत 1,393 वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे.
- त्याबरोबरच, निदान सेवांचा खर्च, औषधे, खोलीचे शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, सर्जनचे शुल्क, पुरवठा, ICU आणि OT शुल्क यांचा देखील समावेश आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile