Ration Card eKYC: ‘अशा’प्रकारे घरबसल्या तुमच्या फोनवरच रेशनसाठी इ-केवायसी करा, पहा सोपी प्रोसेस 

HIGHLIGHTS

रेशन कार्ड होल्डर्सना आता eKYC करणे आवश्यक करण्यात आले आहे.

रेशन कार्ड धारकांच्या सोयीसाठी Mera eKYC ऍप सुरु केले आहे.

घरबसल्या eKYC काम पूर्ण करण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Ration Card eKYC: ‘अशा’प्रकारे घरबसल्या तुमच्या फोनवरच रेशनसाठी इ-केवायसी करा, पहा सोपी प्रोसेस 

Ration Card eKYC: शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्ड होल्डर्सना आता eKYC करणे आवश्यक करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्वस्त इ-पॉस मशीनद्वारे अगदी फ्रीमध्ये eKYC केले जात आहे. परंतु, सध्या वयोवृद्ध आणि लहान मुलांना eKYC साठी डोळे आणि बोटांचे ठसे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यासाठीच आता शासनाने ‘Mera Ekyc App’ सुरु केला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या ऍपद्वारे शिधापात्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानांमध्ये न जाता फोनवरूनच अवघ्या काही वेळात स्वतःचे आणि कुटुंबियांचे eKYC पूर्ण करू शकता. घरबसल्या हे काम पूर्ण करण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Also Read: अरे देवा! आता PAN Card धारकांना 10,000 रुपयांचा दंड? सरकारने केली मोठी कारवाई

Mera eKYC App

वर सांगितल्याप्रमाणे, राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने रेशन कार्ड धारकांच्या सोयीसाठी Mera Ekyc ऍप सुरु केले आहे. याद्वारे रेशन कार्ड धारकांना म्हणजेच लाभार्थ्यांना दुकानात न जाता घरबसल्या मोबाइल फोनवरूनच ही प्रक्रिया अवघ्या काही वेळेत पूर्ण करा येईल. पहा प्रक्रिया-

Ration card
Ration card

ऑनलाईनरित्या eKYC पूर्ण करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून Mera eKYC मोबाइल ऍप, Aadhaar Face RD Service App डाउनलोड करा.
  • आता Mera eKYC ऍप ओपन करा. > राज्य निवडा, > आधार नंबर टाका आणि OTP येईल तो प्रविष्ट करा. > त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करा.
  • पुढे फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. यासाठी तुमच्या फोनचा फ्रंट कॅमेरा सुरु करून चेहरा स्कॅन करा. > स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करा.
  • व्हेरिफिकेशन झाल्यास लाभार्थ्यांची माहिती स्वस्त धान्य दुकानाच्या इ-पॉस मशीनवर दिसेल. > याबदल खात्री करण्यासाठी eKYC स्टेटस तपासणी करा.
  • जर तुम्हाला स्टेटस ‘eKYC Status-Y’ दिसत असेल तर, तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

महत्त्वाचे

महत्त्वाचे काही बोलायचे झाल्यास, ऑनलाईनरित्या eKYC पूर्ण करण्याची प्रोसेस केवळ महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे. तसेच, महत्त्वाचे लक्षात घ्या की, eKYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo