15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय 43 इंच लांबीचा Smart TV, दमदार पिक्चर कॉलिटीसह मिळेल शानदार आवाज
KODAK Special Edition 43 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध
या टीव्हीमध्ये अप्रतिम पिक्चर क्वालिटी आणि उत्तम साउंड सिस्टम उपलब्ध
हा TV सध्या कोणत्याही सवलतीशिवाय 14,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक उत्तम LED Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर काही स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत, जे 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हे स्वस्त टीव्ही फीचर्सच्या बाबतीत कोणत्याही महागड्या टीव्हीपेक्षा कमी नाहीत. या टीव्हीमध्ये केवळ शक्तिशाली पिक्चर क्वालिटी आणि उत्तम साउंड सिस्टमच नाही तर स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील आहेत. ज्यामुळे तुम्हाला YouTube, Netflix आणि Amazon Prime Video सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येईल.
Surveyया रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका स्मार्ट टीव्ही डीलबद्दल माहिती देणार आहोत. होय, आम्ही तुम्हाला KODAK Special Edition 43 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. हा TV सध्या कोणत्याही सवलतीशिवाय 14,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
43 इंच KODAK Special Edition वरील ऑफर्स
Flipkart वर KODAK Special Edition 43 इंच लांबीचा फुल HD LED स्मार्ट लिनक्स टीव्ही फक्त 14,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, यासाठी कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डची किंवा कोणत्याही अतिरिक्त कूपनची आवश्यकता नाही. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुमच्याकडे कोटक बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्यावर 1,250 रुपयांची सूट देखील मिळेल. जर तुम्ही या HDFC क्रेडिट कार्डचा वापर करून EMI केला तर तुम्हाला 1200 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, फ्लिपकार्ट इतर बँकांच्या डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे किंवा UPI द्वारे पेमेंट केल्यास 500 रुपयांची सूट देखील देत आहे. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Flipkart ला भेट द्या.

KODAK 43 इंच Smart TV
KODAK 43 इंच लांबीचा Smart TV बेझल-लेस LED स्मार्ट टीव्हीमध्ये 1366x 786 पिक्सेल रिझोल्यूशनसह HD रेडी डिस्प्ले आहे, जो तीक्ष्ण दृश्ये आणि उत्कृष्ट पिक्चर कॉलिटी प्रदान करतो. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो, जो त्याला जलद आणि सुरळीत कामगिरी देतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. बेझल-लेस डिझाइनमुळे या टीव्हीला प्रीमियम लूक मिळतो आणि अधिक स्क्रीन एरिया मिळतो. ज्यामुळे तुमचा पाहण्याचा अनुभव आणखी चांगला होतो. एकंदरीत, जर तुम्ही बजेट-फ्रेंडली आणि वैशिष्ट्यांनी भरलेला स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
याव्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये बिल्ट-इन वाय-फाय आणि मिराकास्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप वायरलेस पद्धतीने सहजपणे कनेक्ट करण्यास सक्षम असाल. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB आणि HDMI पोर्ट देखील आहेत. ज्याद्वारे इतर उपकरणे, सेट-टॉप बॉक्स किंवा गेमिंग कन्सोल कनेक्ट केले जाऊ शकतात. यासह तुम्हाला स्वस्तात कोडॅक एक जबरदस्त टीव्ही ऑफर करत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile