विकी कौशलचा Chhaava आवडलाय? मराठा साम्राज्यावर आधारित ‘हे’ टॉप 5 चित्रपट नक्की पहा, OTT वर उपलब्ध
छत्रपत्री संभाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून देणाऱ्या छावा चित्रपटाचा सगळीकडेच गाजा-वाजा सुरु आहे.
छावा चित्रपट आवडलाय तर, तुम्हाला मराठा साम्राज्यावर आधारित हे जबरदस्त चित्रपट देखील आवडतील.
मराठा साम्राज्यावर आधारित हे पाच चित्रपट तुमच्या OTT वॉचलिस्टमध्ये जोडायला विसरू नका.
सध्या महाराष्ट्रात आणि भारतात सर्वत्र बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा Chhava चित्रपट जोरदार चर्चेत आहे. छत्रपत्री संभाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून देणारा या चित्रपटाचा सगळीकडेच गाजा-वाजा होत आहे. आपण रोज बातम्यांमध्ये बघतोय की, महाराजांचे भक्त आणि विकीचे चाहते हा चित्रपट पाहून अधिक भावुक होत आहेत. तर, कुठे चित्रपटाच्या बॅनरचे दुग्धाभिषेक केले गेले. तसेच, थिएटरमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व महाराजांच्या नावाचा गजर सुरु असतो. तुम्हाला देखील छावा चित्रपट आवडलाय तर, तुम्हाला मराठा साम्राज्यावर आधारित हे जबरदस्त चित्रपट देखील आवडतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही चित्रपटांची यादी तयार केली आहे, हे चित्रपट OTT वर उपलब्ध आहेत.
SurveyAlso Read: केवळ Chhava चं नाही तर, OTT वर उपलब्ध ‘या’ ऐतिहासिक चित्रपटांनी देखील हादरवले थिएटर!
आपण आपल्या आवडत्या योद्ध्यांची आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांची मानसिकता या चित्रपटांद्वारे समजून घेऊ शकतो. पावनखिंड, तानाजी, पानिपत, हिरकणी इ. चित्रपट आपल्याला मराठा साम्राज्य स्थापनेचे श्रेय देणारे महान मराठा सम्राट शिवाजी महाराजांच्या जीवनाची आणि काळाची माहिती देतात. मराठा साम्राज्यावर आधारित हे पाच चित्रपट तुमच्या OTT वॉचलिस्टमध्ये जोडायला विसरू नका.
पावनखिंड
पावनखिंड चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेतील शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची कहाणी दाखवतो. पावनखिंड, आपल्याला मराठा साम्राज्य स्थापनेचे श्रेय देणारे महान मराठा सम्राट शिवाजी महाराजांच्या जीवनाची आणि काळाची माहिती देते. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीम करू शकता. चित्रपटात अजय पुरकर यांनी बाजीप्रभूंची भूमिका साकारली आहे. तर, शिवाजी महाराजांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकरने निभावली आहे. Imdb वर चित्रपटाला 8.4 रेटिंग आहेत.
Tanhaji: The Unsung Warrior
‘तान्हाजी’ चित्रपटात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असून काजोल आणि सैफ अली खान यांच्यासोबत हे चित्रपट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट सिंहगडाच्या लढाईत बलिदान देणाऱ्या पराक्रमी मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. तानाजींनी अभिमान, शौर्य आणि धैर्याचा वारसा मागे सोडत मराठ्यांना विजय मिळवून देण्यासाठी विशाल कोंढाणा किल्ला चढला. हा चित्रपट JioHotstar वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. Imdb वर चित्रपटाला 7.4 रेटिंग आहेत.
Panipat
आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांनी अनुक्रमे अहमद शाह अब्दाली, सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 18 व्या शतकातील भारतातील काळातील आहे, जेव्हा राजा अहमद शाह अब्दालीने बलाढ्य मराठा साम्राज्य ताब्यात घेण्याची योजना आखली होती. ‘पानिपतच्या युद्धात काय झाले, जे दाखवण्याचा चित्रपटात प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. पानिपत हा चित्रपट Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Farzand
फर्जंद हा दिग्पाल लांजेकर यांचा ऐतिहासिक मराठी भाषेतील ड्रामा चित्रपट आहे. जो 1676 मध्ये पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी फक्त 60 मराठ्यांच्या सैन्यासह 2,500 शत्रू सैनिकांशी लढणाऱ्या मराठा योद्धा कोंडाजी फर्जंद यांच्यावर आधारित आहे. चित्रपट कोंडाजी फर्जंदची भूमिका अंकित मोहनने निभावली आहे. चित्रपटात प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट JioHotstar वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Hirkani
हिरकणी हा चित्रपट शूर हिरकणीच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या हिरकणी या गावकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. एका रात्री उशिरा, जेव्हा हिरकणी किल्ल्यावरून गावाकडे जाण्याचा नेहमीचा मार्ग घेऊ शकत नाही, तेव्हा ती खडकाळ डोंगराच्या वाटेने तिच्या बाळाकडे जाते आणि जमिनीचे नियम मोडते. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुख्य भूमिका निभावली आहे. हा चित्रपट Amazon Prime Video आणि Plex वर उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile