Thomson TV: लेटेस्ट JioTele OS असलेला पहिला Smart TV लाँच, मोठ्या स्क्रीनसह किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
Thomson कंपनीने आपला JioTele OS सह येणारा पहिला स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे.
थॉमसनच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंच लांबीचा QLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
या टीव्हीमध्ये तुम्ही विविध गेम आणि OTT ऍप्स डाउनलोड करू शकता.
सर्वोत्तम Smart TV साठी प्रसिद्ध असलेल्या Thomson कंपनीने आपला JioTele OS सह येणारा पहिला स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंच लांबीची 4K स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला नवीन JioTele OS ऑपरेटिंग सिस्टमचा ऍक्सेस मिळेल. हे नवीन ऑपरेटिंग सिस्टम स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांना AI सर्वोत्तम सामग्री शिफारसी प्रदान करते.
SurveyAlso Read: JioTele OS: AI-पॉवर्ड कंटेंट शिफारसींसह नवी Smart TV ऑपरेटिंग सिस्टम लाँच, काय मिळेल विशेष?
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यात टीव्ही चॅनेलसह लोकप्रिय OTT ऍप्सचा सपोर्ट असेल. तसेच, यात HDR आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या सिस्टमसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि फीचर्स-
Thomson 43-inch QLED TV ची किंमत
Thomson 43-inch QLED TV कंपनीने भारतात केवळ 18,999 रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीची विक्री भारतात आजपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होणार आहे. एवढेच नाही तर, या टीव्हीसह कंपनी 3 महिन्यांपर्यंत JioHotstar आणि JioSaavn चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.

विशेष म्हणजे गेमिंगसाठीही हा टीव्ही नंबर वन ठरेल, असे सांगितले जात आहे. लाँच ऑफरचा एक भाग म्हणून, कंपनी तुम्हाला 1 महिन्याचे JioGames सबस्क्रिप्शन मोफत देखील देणार आहे.
Thomson 43-inch QLED TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
थॉमसनच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंच लांबीचा QLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो बेझल-लेस डिझाइनसह येतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 4K आहे. तसेच, त्यात HDR सपोर्ट देखील आहे. हा टीव्ही अमलॉजिक प्रोसेसर आणि JioTele OS ने सुसज्ज आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम AI-चालित कंटेंट नोटिफिकेशन प्रदान करेल. त्याबरोबरच, ऑडिओसाठी या टीव्हीमध्ये 40W चे डॉल्बी ऑडिओ स्टीरिओ बॉक्स स्पीकर्स आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यात 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. या टीव्हीमध्ये तुम्ही विविध गेम आणि OTT ऍप्स डाउनलोड करू शकता. वर सांगितल्याप्रमाणे. या टीव्हीमध्ये अनेक प्रीलोडेड OTT इन्स्टॉल केलेले असतील. या टीव्हीमध्ये स्पीकर्स, हेडफोन्स, गेम कंट्रोलर, माउस आणि कीबोर्डचा सपोर्ट आहे. तसेच, बिल्ट-इन व्हॉइस असिस्टंट देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवाजाद्वारे टीव्ही नियंत्रित करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल Wi-Fi सपोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile