50MP कॅमेरासह आकर्षक Vivo Y58 5G वर भारी Discount, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
सध्या Vivo च्या Vivo Y58 5G वर चांगली सवलत मिळत आहे.
हा फोन सुंदरबन ग्रीन आणि हिमालयन ब्लू या हटके कलर ऑप्शन्ससह येतो.
फोनमध्ये नाईट, पोर्ट्रेट, ड्युअल व्ह्यू, लाईव्ह फोटो, स्लो-मोशन आणि डॉक्युमेंट्स सारखे अनेक कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Y सिरीजचे स्मार्टफोन्स कंपनीच्या बेस्ट स्मार्टफोन्सपैकी एक आहेत. या सिरीजचे स्मार्टफोन्स कंपनीने पॉवरफुल फीचर्स आणि किफायतशीर किमतीत लाँच केले आहेत. जर तुम्ही देखील या सिरीजमधील स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, आम्ही तुमच्यासाठी एक सर्वोत्तम डील घेऊन आलो आहोत. सध्या Vivo Y58 5G वर चांगली सवलत मिळत आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरासह आकर्षक फीचर्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y58 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Survey
Vivo Y58 5G ची किंमत आणि ऑफर्स
Vivo Y58 5G स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y58 5G स्मार्टफोन सध्या Flipkart वर 16,848 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. तसेच, लक्षात घ्या की, हा फोन 593 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. तसेच, या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हा फोन सुंदरबन ग्रीन आणि हिमालयन ब्लू या हटके कलर ऑप्शन्ससह येतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Vivo Y58 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीनचे पिक्सेल रिझोल्यूशन 2408x 1080 आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. याशिवाय, विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, Vivo Y58 5G स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग मिळाले आहे.

फोटोग्राफीसाठी, या Vivo Y58 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा आणि दुसरा 2MP चा सेन्सर आहे. फोनच्या मागील बाजूस फ्लॅश देण्यात आला आहे. त्याबरोबरच, Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8MP कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये नाईट, पोर्ट्रेट, ड्युअल व्ह्यू, लाईव्ह फोटो, स्लो-मोशन आणि डॉक्युमेंट्स सारखे अनेक कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत.
पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की हा फोन 73.24 तासांचा म्युझिक प्लेबॅक देतो. चार्जिंगसाठी, फोनमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे. मात्र, रॅम 8GB पर्यंत वाढवण्याचा पर्याय देखील आहे. तसेच, मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile