Finally! सिनेरसिकांसाठी अखेर JioHotstar लाँच, स्वस्त सबस्क्रिप्शनसह मजेदार कंटेंटची घ्या मज्जा
Jio ने नवीन मनोरंजन अॅप म्हणून JioHotstar भारतात अधिकृतपणे लाँच केले.
नवे ऍप Disney+ Hotstar आणि JioCinema या दोन्हींचे मिश्रण आहे.
JioHotstar वर 10 भाषांमध्ये कंटेंट पाहण्याची सुविधा आहे, जाणून घ्या सब्स्क्रिप्शनची किंमत
JioHotstar: सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Disney+ Hotstar आणि JioCinema या दोन्हींचे मिश्रण करून Jio ने नवीन मनोरंजन अॅप म्हणून JioHotstar भारतात अधिकृतपणे लाँच केले आहे. JioHotstar बद्दल गेल्या अनेक काळापासून चर्चा सुरु होती. आता अखेर आजपासून जिओसिनेमा वापरकर्त्यांना JioHotstar वर रीडायरेक्ट केले आहे. हा बदल Disney+ Hotstar आणि JioCinema वापरकर्त्यांना प्रभावित करतो. जाणून घेऊयात JioHotstar चे सबस्क्रिप्शन प्लॅन्स-
Surveyतुमच्या माहितीसाठी सांगतो की, JioHotstar ही Viacom18 आणि Star India च्या विलीनीकरणानंतर नोव्हेंबरमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. हे नवीन प्लॅटफॉर्म आता 3,00,000 तासांहून अधिक कंटेंट प्रदान करते, ज्यामध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट, लोकप्रिय टीव्ही शो आणि लाइव्ह स्पोर्टिंग इव्हेंट्सचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे आता 50 कोटींहून अधिक वापरकर्ते असलेले सर्वात मोठे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे.
When two worlds come together, the extraordinary takes shape. #JioHotstar #InfinitePossibilities pic.twitter.com/1eW3qGUPsG
— JioHotstar (@JioHotstar) February 14, 2025
Also Read: Valentine’s Day 2025: थिएटर आणि OTT वर जबरदस्त चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज, व्हॅलेंटाईन बनेल खास!
JioHotstar प्लॅन
JioHotstar च्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, विद्यमान सबस्क्राइबर्स त्यांच्या जुन्या क्रेडेंशियल्ससह लॉग इन करण्यास सक्षम शकतील. याव्यतिरिक्त, नवीन सबस्क्राइबर्स मोबाईल, सुपर आणि प्रीमियम प्लॅनमधून निवड करू शकतील.
मोबाइल प्लॅन:
- 3 महिन्यांसाठी 149 रुपये,
- प्रति वर्ष 499 रुपये (जाहिरात-समर्थित, 1 मोबाइल डिव्हाइसवर HD स्ट्रीमिंग) उपलब्ध.
सुपर प्लॅन:
- 2 महिन्यांसाठी 299 रुपये
- एका वर्षासाठी 899 रुपये (जाहिरात-समर्थित, 2 डिव्हाइसवर FHD स्ट्रीमिंग) उपलब्ध.

प्रीमियम प्लॅन:
- 299 रुपये प्रति महिना (केवळ वेब खरेदी),
- 499 रुपये तीन महिन्यांसाठी
- 1,499 रुपये प्रति वर्ष (लाइव्ह कंटेंट वगळता ऍड-फ्री आणि चार डिव्हाइसवर 4K स्ट्रीमिंग) उपलब्ध.
JioHotstar
JioHotstar बद्दल सांगायचे झाल्यास, जिओ हॉटस्टार 10 भाषांमध्ये 1.4 अब्ज भारतीयांसाठी तयार केलेल्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण कंटेंट स्लेटसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. जगभरातील लोकप्रिय टीव्ही शो, रियालिटी एंटरटेनमेंटपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपट, अॅनिमे आणि आंतरराष्ट्रीय प्रीमियरपर्यंत, जिओ हॉटस्टारने प्रेक्षकांसाठी अधिक मजेशीर कंटेंट आणला आहे. त्याबरोबरच, JioHotstar डिस्ने, NBC युनिव्हर्सल पीकॉक, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी, HBO आणि पॅरामाउंट कडून सर्वोत्तम हॉलिवूड कंटेंट ऑफर करेल.
त्याबरोबरच, जिओ हॉटस्टारने स्पार्क्स नावाचा एक नवीन उपक्रम देखील सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर आयपीएल, डब्ल्यूपीएल आणि आयसीसी इव्हेंट्स सारख्या प्रमुख क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केल्या जातील. प्रेक्षक प्रीमियर लीग, विम्बल्डन आणि प्रो कबड्डी आणि आयएसएल सारख्या देशांतर्गत लीग देखील पाहण्यास सक्षम असतील. हा प्लॅटफॉर्म सिनेरसिकांसाठी एक खास मेजवानी घेऊन आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile