77 इंच, 65 इंच आणि Powerful फीचर्ससह Philips OLED+ TV लाँच, जाणून घ्या सर्व डिटेल्स 

HIGHLIGHTS

Philips ने त्यांचा नवीनतम Smart TV बाजारात सादर केला आहे.

Philips ने बाजारात नवीन OLED+950 आणि OLED+910 असे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत.

फिलिप्स OLED+950 टीव्ही 65-इंच आणि 77-इंच लांबीच्या साईजमध्ये उपलब्ध आहे.

77 इंच, 65 इंच आणि Powerful फीचर्ससह Philips OLED+ TV लाँच, जाणून घ्या सर्व डिटेल्स 

प्रसिद्ध टेक कंपनी Philips ने त्यांचा नवीनतम Smart TV बाजारात सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने बाजारात नवीन OLED+950 आणि OLED+910 असे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. या TV साठी कंपनीचा दावा आहे की, हे वापरकर्त्यांना सर्वोत्तम व्यूविंग आणि गेमिंग एक्सपेरियन्स देतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, OLED+950 मध्ये 65 इंच आणि 77 इंच आकाराचे टीव्ही लाँच करण्यात आले आहेत. तसेच, OLED+910 मॉडेल्ससाठी 55, 65 आणि 77 इंच साईजचे ऑप्शन्स आहेत. TV मध्ये अनेक आकर्षक आणि पॉवरफुल फीचर्स आहेत. जाणून घ्या सर्व तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: फक्त 20,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच लांबीचे Smart TV, स्वस्तात मिळेल थिएटरची मज्जा!

Philips OLED+950 TV

फिलिप्स OLED+950 टीव्ही 65-इंच आणि 77-इंच लांबीच्या साईजमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 9थ जेनरेशन P5 AI ड्युअल इंजिन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे AI च्या मदतीने पिक्चर कॉलिटी सुधारते. टीव्हीमध्ये META Technology 3 OLED पॅनेल आहे. विशेष म्हणजे त्याचा META 3.0 पॅनल स्क्रीनवरील परावर्तन 99% पर्यंत कमी करू शकतो. टीव्हीमध्ये 70W ची 2.1 साउंड सिस्टम आहे. त्यात एक समर्पित बास ड्रायव्हर देखील आहे.

दोन्ही नव्या मॉडेल्समध्ये 4-साइड अँबिलाइट आहे. टीव्ही पाहताना हा प्रकाश आशयानुसार प्रक्षेपित होत राहतो. यामुळे कंटेंट पाहण्याचा अनुभव चांगला मिळतो. हे टीव्ही Google OS वर चालतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने अद्याप दोन्ही नव्या स्मार्ट टीव्हीच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत.

नवे Philips OLED+ TV लाँच ( Image credit: X)

Philips OLED+910 TV

Philips OLED+910 टीव्ही 55-इंच, 65-इंच आणि 77-इंच साईजमध्ये सादर करण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये देखील 9व्या पिढीतील P5 AI ड्युअल इंजिन आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हे AI च्या मदतीने पिक्चर कॉलिटी सुधारते. टीव्हीमध्ये META Technology 3 OLED पॅनेल आहे. लक्षात घ्या की, यासह स्क्रीनवरील परावर्तन मोठ्या प्रमाणात कमी होते आणि वीज वापर देखील कमी होतो.

त्याबरोबरच, कंपनीने दोन्ही टीव्हीमध्ये गेमर्ससाठी खास फीचर्स देखील दिले आहेत. यामध्ये गेम बार नावाचे एक खास फीचर्स आहे, जे लोकप्रिय गेम स्वयंचलितपणे शोधतो. याशिवाय, टीव्हीमध्ये मिनी मॅप झूम फीचर देखील आहे. यासह, वापरकर्ता गेम मॅप्स देखील झूम करून मोठे करू शकतो. गेम दरम्यान चांगल्या व्हिजिबिलिटीसाठी त्यामध्ये कलर हेल्पर मोड देखील उपलब्ध आहे. साउंडसाठी, OLED+910 मध्ये बॉवर्स आणि विल्किन्स 3.1 साउंड सिस्टम उपलब्ध आहेत, असे सांगितले गेले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo