Nothing चा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात होणार दाखल! लाँच डेट कन्फर्म, पहा टीझर Video

HIGHLIGHTS

Nothing च्या आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.

27 जानेवारी रोजी अखेर कंपनीने नवीन डिव्हाइसच्या लाँच तारखेची पुष्टी केली.

हा फोन कंपनी Nothing Phone 3 किंवा Nothing Phone 3A म्हणून लाँच करू शकते.

Nothing चा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात होणार दाखल! लाँच डेट कन्फर्म, पहा टीझर Video

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing च्या आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. दरम्यान आज सोमवार 27 जानेवारी रोजी अखेर कंपनीने नवीन डिव्हाइसच्या लाँच तारखेची पुष्टी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. लक्षात घ्या की, आगामी उपकरणाची पहिली झलक या 7 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

आगामी स्मार्टफोन हा कंपनीचा नवीन स्मार्टफोन आहे, जो Nothing Phone 3 किंवा Nothing Phon 3a म्हणून सादर केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात आगामी स्मार्टफोनचे लॉन्चिंग डिटेल्स-

Nothing आगामी स्मार्टफोनचे भारतीय लॉन्चिंग

Nothing India ने आपल्या अधिकृत X हँडलवर 7 सेकंदाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह डिव्हाइसच्या लाँच तारखेची पुष्टी केली गेली आहे. ‘पॉवर इन पर्स्पेक्टिव्ह’ टायटलसह हा व्हीडिओ जाहीर करण्यात आला आहे. हे डिव्हाइस 4 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता भारतात लाँच केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, टीझर व्हिडिओद्वारे असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा कंपनीचा नेक्स्ट जनरेशनचा स्मार्टफोन असेल.

हा फोन कंपनी Nothing Phone 3 किंवा Nothing Phone 3A म्हणून लाँच करू शकते. टीझर व्हिडिओबद्दल बोलताना, या 7 सेकंदाच्या व्हिडिओने फोनच्या कॅमेरा मॉड्यूलची एक झलक दिली आहे. कॅमेरा मॉड्यूलकडे पहात असताना असे दिसते की, हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असू शकतो. यामध्ये, एक सेन्सर स्वतंत्रपणे सापडेल, तर दोन सेन्सर एकाच वेळी बॉटमला स्थित असतील. तुम्ही वर दिलेल्या पोस्टमध्ये टिझर व्हीडिओ पाहू शकता.

Nothing Phone 3 लीक

Nothing first smartphone in 2025

वर सांगितल्याप्रमाणे, Nothing Phone 3 बद्दल दीर्घकाळापासून अनेक लीक्स पुढे येत आहेत. लीकवर विश्वास ठेवला तर, हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. याशिवाय, हा फोन Android 15 आधारित Nothing OS 3.0 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB RAM आणि 12GB RAM चे पर्याय मिळू शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo