Tips: Google Pay वर ‘अशा’प्रकारे बंद करा ऑटो पे! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया
काही सबस्क्रिप्शन नेहमीकरता हवे असतात, त्यासाठी Google Pay वर ऑटोपेची आवश्यकता आहे.
Google Pay वर अनावश्यक पेमेंट्स टाळण्यासाठी ऑटोपे बंद करा.
जाणून घ्या Google Pay वर ऑटोपे बंर करण्याची स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
Tech Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजकाल ऑनलाइन पेमेंट व्यवहार करणे, सामान्य झाले आहे. मात्र, प्रत्येक पेमेंटसाठी तारीख पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावी लागते. हे टाळण्यासाठी बहुतेक लोक AutoPay पर्यायाचा वापर करतात. मात्र, यामध्ये देखील तुम्हाला ऑटोपे पर्याय आठवत नसल्यास तुमच्या खात्यातून पैसे स्वयंचलितपणे कट केले जातात. अशा परिस्थितीत, तुम्हाला द्यायचे नसलेल्या वर्गणीचे पैसे देखील कापले जातात. ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला Google Pay चे ऑटोपे फीचर बंद करायला हवे.
SurveyAlso Read: Laptop Tips: अरे व्वा! लॅपटॉपमध्ये ठेवता येईल ‘पिक्चर पासवर्ड’, जाणून घ्या मजेशीर सिक्रेट फिचर
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही एखाद्या OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन घेतला आहे. यासह, तुम्हाला ते सबस्क्रिप्शन संपल्यावरही स्वयंचलितपणे निश्चित तारखेला सदस्यता खरेदी करायची आहे. तर, यासाठी ऑटोपे फिचर Google Pay वर दिले गेले आहे. परंतु आपण Google वरून ऑटोपे करू इच्छित नसल्यास ते बंद केले पाहिजे. जर तुम्ही हे बंद केले नाही तर, निश्चित तारखेला तुमच्या खात्यातून पैसे वजा केले जातील. ऑटोपे बंद करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

Google Pay वर ऑटोपे बंर करण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम आपल्या फोनमध्ये Google पे अॅप ओपन करा. यानंतर, ऑटोपे सेटिंग्ज ऑप्शनवर जावे लागेल.
- यासाठी आपल्याला वरच्या उजव्या कोपर्यात टॅप करावे लागेल. मग आपल्याला ऑटोपे पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आपल्याला सक्रिय ऑटोपे सबस्क्रिप्शनची यादी दिसेल. आपण बंद करू इच्छित असलेल्या सबस्क्रिप्शनवर टॅप करा.
- यानंतर कॅन्सल ऑटोपे पर्यायावर टॅप करा. यासाठी, आपल्याला Confirm पर्यायावर टॅप करावे लागेल.
- मग आपल्याला UPI पिन पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. एकदा ऑटोपे निवडल्यानंतर कॅन्सलेशन मॅसेज येईल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, आजच्या काळात Google पे, फोनपे सारखे बहुतेक प्लॅटफॉर्म ऑटोपे प्रदान करतात. तथापि, प्रत्येक ऑनलाइन पेमेंट ऍपचे ऑटोपे फिचर बंद करण्याची प्रक्रिया वेगळी आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile