प्रतीक्षा संपली! WhatsApp स्टेटससह जोडता येईल आवडते गाणे, जबरदस्त फीचर लवकरच होणार दाखल

HIGHLIGHTS

आता WhatsApp आपल्या नवीन फिचर अपडेट्समुळे वापरताना नक्कीच मजेशीर झाले आहे.

अखेर नव्या फिचरद्वारे WhatsApp स्टेटससह म्युझिक जोडता येईल.

WhatsApp स्टेटसवर 'मेन्शन फिचर' अलीकडेच रोल आऊट झाले आहे.

प्रतीक्षा संपली! WhatsApp स्टेटससह जोडता येईल आवडते गाणे, जबरदस्त फीचर लवकरच होणार दाखल

आपणा सर्वांना माहितीच आहे की, लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स सादर करत असतो. आता WhatsApp आपल्या नवीन फिचर अपडेट्समुळे वापरताना नक्कीच मजेशीर झाले आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍपने आता बहुप्रतीक्षित फिचर अपडेट आणले आहे. होय, Instagram प्रमाणे, तुम्हाला व्हॉट्सऍप स्टेटसवर म्युझिक जोडण्याचे फीचर देखील मिळत आहे. आता तुम्ही तुमच्या फोटोवर कोणतेही गाणे पोस्ट करू शकता. तुम्हाला येथे संपूर्ण गाण्यांची संपूर्ण लायब्ररी मिळणार आहे. पाहुयात डिटेल्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 50MP फ्रंट कॅमेरासह Vivo V40 Pro 5G वर तब्बल 6000 रुपयांची सूट, अशी डील पुन्हा मिळणार नाही

आम्ही तुम्हाला सांगतो की, इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये तुमच्या फोटो किंवा व्हीडिओसह म्युझिक/गाणी जोडण्याची सुविधा आहे. मात्र, व्हॉट्सऍप स्टेटससाठी तुम्हाला ही सुविधा मिळत नव्हती. अखेर नव्या फिचरद्वारे WhatsApp स्टेटससह म्युझिक जोडता येईल, अशी माहिती मिळाली आहे. सध्या, Android 2.25.2.5 साठी व्हॉट्सॲप बीटावर या फिचरची चाचणी केली जात आहे. हे वैशिष्ट्य फक्त काही निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

WhatsApp New Status music Feature

WhatsApp ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी साईट WABetainfo ने अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे. हे फिचर सध्या डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. काही बीटा युजर्ससाठी हे फिचर रोलआऊट झाले आहे. नव्या फिचरमध्ये, स्टेटसवर जाऊन ड्रॉईंग एडिटरमध्ये तुम्हाला नवीन पर्याय मिळेल.

यानंतर, तुम्ही Meta च्या म्युझिक कॅटलॉगमधून गाणी ब्राउझ करण्यास सक्षम असाल. वर सांगितल्याप्रमाणे, हे इन्स्टाग्राम फीचर सारखे असेल. इंस्टाग्रामच्या म्युझिक लायब्ररीप्रमाणे, तुम्हाला WhatsApp च्या म्युझिक कॅटलॉगमधून कोणतेही गाणे निवडता येतील. यामध्ये तुम्हाला स्वतंत्र ट्रेडिंग ट्रॅक आणि आर्टिस्ट सेक्शनदेखील मिळणार आहेत. यासह, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्च करण्यास सक्षम असाल.

WhatsApp 
whatsapp

WhatsApp Features

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, WhatsApp स्टेटसवर ‘मेन्शन फिचर’ अलीकडेच रोल आऊट झाले आहे. या वापर करण्यासाठी, आधी तुमच्या WhatsApp स्टेटसवर खाली दिसत असलेल्या @ चिन्हावर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्समध्ये @ वर क्लिक करा, यात संपर्कांची संपूर्ण यादी उघडणार आहे. यासह तुम्ही तुमच्या स्टेटसवर तुमच्या संपर्काना नमूद म्हणजेच मेन्शन करू शकता. तुम्ही सर्च बारमध्ये नाव टाइप करून देखील ते शोधू शकता. लक्षात घ्या की, नमूद केलेला संपर्क प्रत्येकाला दर्शविला जात नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo