Airtel New Prepaid Plan: कंपनीने लाँच केला नवा प्लॅन! सुपरफास्ट इंटरनेटसह मिळतील 600SMS| Tech News 

HIGHLIGHTS

Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला.

Airtel चा नवा प्लॅन 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो.

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये 600SMS ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Airtel New Prepaid Plan: कंपनीने लाँच केला नवा प्लॅन! सुपरफास्ट इंटरनेटसह मिळतील 600SMS| Tech News 

प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर प्लॅन्समध्ये महत्त्वाचे बेनिफिट्स मिळतीलच. पण यासह तुम्हाला प्रीमियम ॲप सब्सक्रिप्शन देखील मोफत दिले जाणार आहे. विशेष म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 600SMS मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Airtel च्या नव्या प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Airtel New Prepaid Plan

वर सांगितल्याप्रमाणे, नवा प्लॅन 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. होय, Airtel च्या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 395 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये एकूण 6GB डेटा दिला जाणार आहे. एवढेच नाही तर, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये 600SMS ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Airtel long term plans

इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनसह तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Apollo 24/7 आणि Wynk Music चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्याबरोबरच, यामध्ये मोफत Hello Tunes देखील उपलब्ध आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता जवळपास दोन महिन्यांची म्हणजेच एकूण 56 दिवसांची आहे.

समान किमतीत येणारा नवा प्लॅन

टेलिकॉम कंपनी Airtel ने नुकताच T20 वर्ल्ड कपसाठी एक नवीन प्लॅन जारी केला आहे. या प्लॅनची किंमत 499 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला 3GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी मोफत दिले जात आहे. या प्लॅनमध्ये 20 OTT प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस उपलब्ध आहे. हा प्लॅन खास क्रिकेट युजर्ससाठी डिझाईन केला गेला आहे. यासह तुम्हाला या प्लॅनमध्ये HD क्वालिटीमध्ये मॅचचा आनंद घेता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo