Rules Changing From June 1: Aadhaar Card आणि Driving License साठी नवे नियम, वाचा सविस्तर

HIGHLIGHTS

1 जून 2024 पासून आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्समध्येही काही मोठे बदल होणार

14 जूनपर्यंत ऑनलाइन पोर्टलवर सर्व आधार अपडेट मोफत असतील.

भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळविण्यासाठी नवीन नियम जारी केले.

Rules Changing From June 1: Aadhaar Card आणि Driving License साठी नवे नियम, वाचा सविस्तर

भारतीय ग्राहकांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. आजपासून म्हणजेच 1 जून 2024 पासून अनेक नियम बदलणार आहेत. LPG सिलिंडरच्या किंमतीपासून ते Aadhaar कार्ड आणि Driving License पर्यंत अनेक बदल होणार आहेत. आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्समध्येही काही मोठे बदल होणार आहेत. तसेच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Important Tips: ‘या’ फीचरद्वारे तुमचे Aadhar कार्ड सुरक्षित करा, कुणालाही चुकीचा वापर करता येणार नाही। Tech News

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला उद्यापासून आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्समधील अपडेट्सबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती-

Rules Changing From June 1

Aadhar Card अपडेट

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी आधार तपशील ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती. मात्र, आता ती 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 14 जूनपर्यंत ऑनलाइन पोर्टलवर सर्व आधार अपडेट मोफत असतील. त्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांचे तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

Aadhaar Card Free Update

त्यामुळे जर तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा पत्ता मोफत अपडेट करायचा असेल तर, ते 14 जूनपूर्वी करून घ्या. लक्षात ठेवा की, ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क आहे. जर तुम्ही तुमचे जुने किंवा नवीन आधार कार्ड अपडेट केले नाही तर ते अवैध होणार नाही. नवीन आधार अपडेट्स त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना त्यांचे Aadhar ऑनलाइन अपडेट करायचे आहेत.

Driving License Rules

भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळविण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. 1 जून 2024 पासून तुम्हाला आता तुमच्या जवळच्या सरकारी RTO च्या खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचा पर्याय मिळेल. ही केंद्रे आता लायसेन्स पात्रतेसाठी चाचण्या घेणार आहेत.

  • DL साठी अर्ज करण्यासाठी, वाहतूक वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/ ला भेट द्या.
  • यानंतर होम पेजवर ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ वर टॅप करा. त्यानंतर राज्य निवडा आणि शिकाऊ किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करा.
  • आता पुढे आलेल्या प्रक्रियेनुसार मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि परवान्यासाठी अर्ज करा.

याव्यतिरिक्त, लक्षात घ्या की, अल्पवयीन मुलांच्या दंडासाठी काही अपडेट्स आले आहेत.

  • अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना 25,000 रुपये दंड ठोठावला जाईल. वाहन नोंदणी कार्ड रद्द केले जातील.
  • अल्पवयीन व्यक्तीवर शुल्क आकारल्यास, तो किंवा ती वयाच्या 25 वर्षापर्यंत परवाना मिळविण्यास पात्र होणार नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo