Vodafone Idea New Plan: कंपनीने लाँच केला नवा 125 रुपयांचा प्लॅन, भरपूर डेटासह चुटकीसरशी करा सर्व कामे। Tech News 

HIGHLIGHTS

Vodafone Idea ने 125 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे.

अलीकडेच VI कंपनीने 19 आणि 49 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत.

या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर डेटा सुविधा मिळणार आहे.

Vodafone Idea New Plan: कंपनीने लाँच केला नवा 125 रुपयांचा प्लॅन, भरपूर डेटासह चुटकीसरशी करा सर्व कामे। Tech News 

देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम प्रदाता कंपनी Vodafone Idea VI कंपनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असते. अलीकडेच कंपनीने 19 आणि 49 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत. याच लाइनअपमध्ये कंपनीने प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये आणखी एक स्वस्त डेटा ॲड-ऑन पॅक समाविष्ट केला आहे. कंपनीचा हा नवा प्लॅन 125 रुपये किमतीचा आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनसोबत संबंधित सर्व तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!
Vodafone Idea 125 recharge plan
Vodafone Idea 125 recharge plan

Vodafone Idea चा 125 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea कंपनीने प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन डेटा ॲड-ऑन पॅक सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 125 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea (Vi) चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, यामध्ये फक्त डेटा सुविधा देण्यात आली आहे. कॉलिंग आणि SMS साठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची ​​आवश्यकता असणार आहे.

प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vodafone Idea च्या नवीन 125 रुपयांच्या डेटा ॲड-ऑन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1GB डेटाची सुविधा मिळणार आहे. वैधतेदरम्यान या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 28GB डेटाचा ॲक्सेस मिळेल. हा प्लॅन फक्त डेटा सुविधा मिळणार आहे.

Vodafone Idea चा 19 आणि 49 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या 19 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये 1 दिवसाची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये डेटाशिवाय कॉलिंग आणि SMS सुविधाही उपलब्ध नाहीत. दुसरीकडे, 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 1 दिवसाची वैधता उपलब्ध आहे. मात्र, या प्लॅनमध्ये यूजर्सला 20GB डेटाचा ॲक्सेस मिळतो. लक्षात घ्या की, वापरकर्त्यांना हा 20GB डेटा फक्त 1 दिवसात संपवावा लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo