Realme New Series: कंपनी लवकरच नवी ‘P’ सिरीज सादर करणार, अफोर्डेबल आणि Powerful स्मार्टफोन्स होतील लाँच

HIGHLIGHTS

Realme ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सिरीज जाहीर केली आहे.

नवी सिरीज भारतात Realme P Series नावाने लाँच केली जाईल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कंपनीचे उपाध्यक्ष चेस जू यांनी दिली माहिती

Realme New Series: कंपनी लवकरच नवी ‘P’ सिरीज सादर करणार, अफोर्डेबल आणि Powerful स्मार्टफोन्स होतील लाँच

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये पॉप्युलर आहेत. कंपनीने अलीकडेच आपला नवीनतम Realme 12X 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. यानंतर आता कंपनी आपली नवीन स्मार्टफोन सिरीज सादर करणार आहे. होय, आता ब्रँडने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सिरीज जाहीर केली आहे, ती भारतात Realme P Series नावाने लाँच केली जाईल. विशेष म्हणजे या सिरीजसह स्वस्त 5G फोन बाजारात येणार आहेत. कंपनीचे प्रमुख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Realme P Series

वर सांगितल्याप्रमाणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कंपनीचे उपाध्यक्ष चेस जू यांनी Realme च्या नवीन पॉवर सीरीजबद्दल एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. तुम्ही वर दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की, ब्रँडच्या प्रमुखाने ‘P = Power सीरिज’ची घोषणा केली आहे. जी लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाईल.

या पॉवरफुल सिरीजअंतर्गत स्वस्त 5G स्मार्टफोन असतील, असेही सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच, हे स्मार्टफोन केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध केले जातील, अशी देखील माहिती मिळाली आहे. ब्रँड प्रमुखाने व्हिडिओमध्ये सांगितले की, Realme ची नवीन P सिरीज पूर्वीच्या सरासरी कामगिरीपेक्षा चांगली फीचर्स प्रदान करेल. त्याबरोबरच, नेहमीच कंटाळवाणा डिझाइन देखील बदलला जाईल.

याव्यतिरिक्त, कंपनीने शेअर केलेल्या टीझरमध्ये कॅमेऱ्याच्या उत्तम कामगिरीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. म्हणजे फोनमध्ये चांगला कॅमेरा सेटअप दिसू शकतो. या ऐवजी कंपनीने अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. कंपनी भविष्यात या फोनच्या लाँच आणि फीचर्सशी संबंधित इतर माहिती शेअर करू शकते, अशी अपेक्षा आहे.

म्हणजेच Realme च्या प्रमुखाने येत्या Realme P सिरीजमधील स्वस्त आणि पॉवरफुल स्मार्टफोन्ससह 5G विभागातील बदलाचे एक नवीन रूप दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. फोनचे नाव आणि लॉन्च तारीख कधी ब्रँड घोषित करेल, हे अजूनही पडद्याआड आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo