POCO X6 Neo च्या भारतीय लाँचची पुष्टी! Affordable रेंजमध्ये आगामी फोनची होणार दाखल। Tech News
POCO X6 Neo संदर्भात काही लीक रिपोर्ट्स अलीकडेच समोर आले.
Poco इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी POCO X6 Neo लाँचची पुष्टी केली.
POCO X6 Neo भारतात या महिन्यात 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान लाँच केला जाऊ शकतो.
Poco च्या नवीन स्मार्टफोन POCO X6 Neo संदर्भात काही लीक रिपोर्ट्स अलीकडेच समोर आले आहेत. आता कंपनीचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी डिव्हाइसच्या लाँचची पुष्टी केली आहे. होय, कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. इतकेच नाही तर याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे माहिती देखील उघड केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी POCO X6 Neo चे सर्व तपशील-
SurveyPOCO X6 Neo चे भारतीय लाँच
After seeing today's launch, everyone should REALly wait for the 'Neo' upgrade.
— Himanshu Tandon (@Himanshu_POCO) March 6, 2024
Red Flags: Dimensity 6100+, LCD at 17k? 😮😕
Just an FYI, we use Dimensity 6100+ in #POCOM65G which is priced under 10k. #POCOX6Neo
Poco इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी POCO X6 Neo लाँच केल्याची पुष्टी केली आहे. काल Realme 12 5g सिरीज भारतात लाँच करण्यात आली. ब्रँड हेड टंडन यांनी सांगितले की, या लाँचनंतर आता आगामी Neo च्या लाँचची प्रतीक्षा करावी. तुम्ही अधिकृत पोस्टमध्ये बघू शकता की, त्यांनी कंपनीच्या POCO M6 5G चा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये MediaTek Dimensity 6100+ वापरण्यात आला आहे. हा फोन सुमारे 10,000 रुपयांना मिळते.
LCD at 17K? Wait up for something Neo.😈
— POCO India (@IndiaPOCO) March 6, 2024
त्याबरोबरच, ब्रँडने त्यांच्या X हँडलवरून एक नवीन पोस्ट देखील जारी केली गेली आहे. ज्यामध्ये नवीन NEO फोनचे आगमन पाहिले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, लाँचची तारीख अद्याप उघड करण्यात आली नाही. परंतु नवीन POCO X6 Neo भारतात या महिन्यात 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान लाँच केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.
POCO X6 Neo बाबत सर्व लीक्स

लीक रिपोर्टनुसार, नवीन मोबाइल Poco X6 Neo भारतात 16 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऑफर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत जवळपास 15,499 रुपये इतकी आहे. ही किंमत फोनच्या बेस मॉडेलसाठी असण्याची शक्यता आहे. यासह हाय स्टोरेज मॉडेल देखील येऊ शकतात.
त्याबरोबरच, लीकनुसार, Poco X6 Neo ला 6.67 इंच फुल HD+OLED दिले जाऊ शकतो. परकर्त्यांना मोबाइलमध्ये MediaTek डायमेंशन 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये 108MP प्राइमरी आणि 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 5,000 mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile