Realme 12 Pro Max 5G ची ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, किंमत लाँचपूर्वीच लीक। Tech News
Realme 12 Pro सीरीज 29 जानेवारी रोजी होणार लाँच
Realme 12 Pro Max 5G चे लाँच Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ सोबत टीज केले गेले आहे.
Realme 12 Pro Max 5G ची भारतीय किंमत लाँचपूर्वी लीक
अलीकडेच आगामी Realme 12 Pro सिरीजची लाँच डेट कंपनीने जाहीर केली आहे. Realme 12 Pro सीरीज 29 जानेवारी रोजी म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme 12 Pro Max 5G चे लाँच Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ सोबत टीज केले गेले आहे. लोकप्रिय टिपस्टरने Realme 12 Pro Series च्या Pro Max व्हेरिएंटबद्दल माहिती शेअर केली आहे. यामध्ये एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे, ज्यात Realme 12 Pro Max 5G ची किंमत स्पष्ट दिसत आहे.
SurveyRealme 12 Pro Max 5G ची लीक किंमत
प्रसिद्ध टिपस्टर योगेश बरार यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. Realme 12 Pro Series चे Pro Max व्हर्जन देखील भारतात लाँच केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ट्विटमध्ये Realme 12 Pro Max चे मार्केटिंग मटेरियल देण्यात आले आहे.
Got this in the mail!
— Yogesh Brar (@heyitsyogesh) January 17, 2024
Looks like we are also getting a Pro Max version in the upcoming Realme 12 Pro series.
How do you like this pricing?? pic.twitter.com/VnfC1SzcWN
वरील पोस्टनुसार, Realme 12 Pro Max दोन व्हेरिएंटसह आणला जाईल. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटर्नल स्टोरेज आहे. तर, टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. फोनची सुरुवातीची किंमत 33,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 35,999 रुपयांना लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे.
Realme 12 Pro Max 5G चे संभावित तपशील

Realme 12 Pro Max 5G च्या संभावित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह कर्व डिस्प्ले असेल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालेल. या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आणि 64MP पेरिस्कोप पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. फोनबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनी लवकरच भारतीय लाँच डेट आणि स्मार्टफोनची अधिक माहिती उघड करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile