How to: PhonePe वर UPI Lite सर्व्हिस कशी सुरू करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया। Tech News 

HIGHLIGHTS

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 2022 मध्ये UPI Lite सेवा सुरू केली.

UPI Lite मध्ये 200 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन व्यवहार करू शकता.

PhonePe वर UPI Lite सेवा ऍक्टिव्ह करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सोपी प्रोसेस

How to: PhonePe वर UPI Lite सर्व्हिस कशी सुरू करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया। Tech News 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2022 मध्ये UPI Lite सेवा सुरू केली. ही UPI पेमेंट प्रणालीचे थोडे सोपे वर्जन आहे, जी छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी जारी केली गेली होती. Original UPI द्वारे तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंतचे दैनंदिन व्यवहार करू शकता, तर UPI Lite मध्ये 200 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन व्यवहार करू शकता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Jio 5G Plans 2024: कंपनीचे टॉप 5 Best प्लॅन्स, Unlimited बेनिफिट्ससह OTT सब्स्क्रिप्शन देखील उपलब्ध

अशाप्रकारे, जे वापरकर्ते दररोज किमान UPI ​​व्यवहार करतात त्यांच्यासाठी UPI Lite हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष बाब म्हणजे UPI Lite च्या छोट्या व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना UPI पिन टाकण्याची देखील गरज नाही. ही सोपी प्रणाली लाँच झाल्यापासून अनेक पॉप्युलर पेमेंट ऍप्सने ही सर्व्हिस आपापल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये Google Pay, PhonePe आणि Paytm Appsचा समावेश आहे.

upi lite payment

दरम्यान, जर तुम्ही PhonePe वापरकर्ते असाल आणि तुम्हाला लहान व्यवहारांसाठी UPI Lite सेवा वापरायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला PhonePe वर UPI Lite सेवा ऍक्टिव्ह करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सोपी प्रोसेस सांगणार आहोत.

PhonePe वर UPI Lite सेवा कशी सुरू करावी?

  • सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर PhonePe App ओपन करा.
  • आता तुम्हाला PhonePe च्या होम स्क्रीनवर UPI Lite आयकॉन दिसेल. या बॅनरवर क्लिक करा.
  • दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर टॅप करून UPI ​​Lite चा ऑप्शन बघू शकता.
  • UPI Lite ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला UPI Lite मध्ये ‘Add Money’ अंतर्गत बॅलेन्स जोडण्यास सांगितले जाईल.
  • लक्षात घ्या की, तुम्ही UPI Lite मध्ये 200 रुपयांपर्यंत बॅलन्स ठेऊ शकतो.
  • त्यानंतर, तुम्ही PIN न टाकता UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंत पेमेंट करण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo