Reliance Jio ने आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये नवीनतम प्लॅन्स सादर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे. आम्ही तुम्हाला असाच एक प्लॅन सांगणार आहोत जो मासिक प्लॅनची एक्स्टेंडेड आवृत्ती आहे. यामध्ये, डेटा देखील दररोज उपलब्ध आहे आणि काही फ्री Apps चे सब्सक्रिप्शन देखील आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Jio चा 2,545 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओने अलीकडेच त्यांच्या दीर्घकालीन प्लॅन्स अपडेट केले आहेत. यामध्ये, कंपनीने एक स्वस्त प्लॅन जोडला आहे, जो 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. होय, आम्ही 2,545 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. यामध्ये यूजरला दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 504GB डेटा देत आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड फक्त 64 Kbps पर्यंत राहील. पात्र ग्राहकांना प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.
याव्यतिरिक्त, या Jio प्लॅनमध्ये दररोज 100SMS ची सुविधा मिळेल. त्याबरोबरच, हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग बेनिफिट्ससह देखील येतो. वापरकर्ता अमर्यादित लोकल/ STD कॉल करू शकतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये युजर्सना मोफत OTT Apps JioTV, JioCinema, JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
JioTV वर टीव्ही कंटेंट पाहिला जाऊ शकतो. जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला या पॅकसह JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल, जो प्लॅनच्या वैधतेपर्यंत वैध असेल. याशिवाय, Jio प्लॅनसह उपलब्ध JioCloud तुम्हाला अतिरिक्त स्टोरेज ऑप्शन्स देतो.
या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही Reliance Jio च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या दूरसंचार विक्रेत्याकडून सक्रिय केला जाऊ शकतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile