Limited Time Deal! BSNL ग्राहकांना मिळाले मोठे गिफ्ट, ‘या’ लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये तब्बल 1 महिन्याची अतिरिक्त वैधता Free
BSNL आपल्या दीर्घकालीन वैधता प्लॅनसह 30 दिवसांची अतिरिक्त वैधता प्रदान करत आहे.
लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीपर्यंत वैध असेल.
BSNL च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो.
सरकारी टेलिकॉम दिग्गज BSNL कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन मर्यादित कालावधीची ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या दीर्घकालीन वैधता प्लॅनसह 30 दिवसांची अतिरिक्त वैधता प्रदान करत आहे. BSNL ने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवरून या ऑफरची माहिती दिली. चला जाणून घेऊयात नवीन ऑफरशी संबंधित सर्व तपशील-
SurveyBSNL ची नवी ऑफर
वर सांगितल्याप्रमाणे, BSNL ने आपल्या अधिकृत X हँडलद्वारे नवीन ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने ग्राहकांना माहिती दिली आहे की, कंपनी आता 2,999 रुपयांच्या सुपरचार्ज प्लॅनसह अतिरिक्त वैधता प्रदान करत आहे. मात्र, लक्षात घ्या की ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीपर्यंत वैध असेल. पण काळजी करू नका कारण ही ऑफर 1 मार्चपर्यंत वैध आहे. त्यामुळे तुमच्याकडे आणखी बराच वेळ उपलब्ध आहे.
Supercharge your connectivity with BSNL!
— BSNL India (@BSNLCorporate) December 11, 2023
Unlock an extra 30 days of unlimited calling and data when you recharge with #PV2999. Stay connected, stay limitless!#RechargeNow: https://t.co/N7nS6NHhzu (For NZ,WZ& EZ) https://t.co/s6KNI4ijaZ (For SZ)#BSNL #RechargeRewards pic.twitter.com/tR15ruD9Bj
जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल आणि लवकरच नवीन रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कंपनी 2,999 रुपयांच्या या लॉन्ग टर्म प्लॅनसह 30 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे.
BSNL चा 2,999 रुपयांचा प्लॅन
BSNL चा हा लॉन्ग टर्म प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची वैधता दिली जाते. नवीन ऑफर अंतर्गत पुढील रिचार्ज करणार्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. अतिरिक्त वैधतेसह वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 395 दिवसांची वैधता मिळेल.

प्लॅनमध्ये उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो. नव्या ऑफर अंतर्गत रिचार्ज केल्यास हा प्लॅन वापरकर्त्यांना संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 1,185GB डेटाचा ऍक्सेस देणार आहे. यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile