How to: तुमच्या Android फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे? स्टेप बाय स्टेप बघा अगदी सोपी प्रक्रिया। Tech News

HIGHLIGHTS

सध्या लोक ऑफिसमध्ये आणि घरी देखील Wi-Fi चा वापर करत आहेत.

वाय-फाय कॉलिंग आता खूप सामान्य झाले आहे.

फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे? ते जाणून घ्या.

How to: तुमच्या Android फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे? स्टेप बाय स्टेप बघा अगदी सोपी प्रक्रिया। Tech News

लॉकडाऊनच्या काळापासून काम करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. होय, या काळात एक नवीन आणि लोकप्रिय पद्धत पुढे आली आहे. त्यापैकी एक ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत आणि ‘हायब्रिड’ पद्धत आहे. यासाठी, सध्या लोक ऑफिसमध्ये आणि घरी देखील Wi-Fi चा वापर करत आहेत. त्यामुळे, वाय-फाय इंटरनेट हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: लाँचपूर्वीच OnePlus 12 चा Attractive फर्स्ट लुक आला समोर, फोटोग्राफीसाठी ठरेल उत्तम पर्याय। Tech News

जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर Wi-Fi कॉलिंगचे नाव तुम्ही ऐकले असेलच. वाय-फाय कॉलिंग आता खूप सामान्य झाले आहे. तुम्हाला ते सर्व स्मार्टफोनमध्ये मिळेल, पण अनेकांना याची कल्पना नाही. चला तर मग आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे? याबाबत माहिती देणार आहोत.

Wi-Fi

फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे?

  • सर्वप्रथम तुमचा Android फोन Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करा.
  • आता फोन Settings वर जा. तुम्ही कॉल आयकॉनसह App च्या वरच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • Settings: Wi-Fi कॉलिंग पर्याय दिसेल.
  • त्यातील Wi-Fi कॉलिंग ऑन करा.
  • आता हा पर्याय तुमच्या नोटिफिकेशन टॉगलमध्ये देखील दिसेल.
  • यानंतर, जेव्हाही तुम्ही कॉल कराल आणि Wi-Fi नेटवर्क झोनमध्ये असाल तेव्हा हे फीचर काम करेल आणि तुम्ही यासह आरामशीर कॉलवर बोलू शकता.

लक्षात घ्या की, सर्व फोन्समध्ये ही सेटिंग वेगवेगळी असेल. साधारणतः Wi-Fi कॉलिंगचे फिचर कॉलिंग फोन App आणि नेटवर्कच्या ऍडवान्स सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल.

Wi-Fi कॉलिंगचे फायदे

  • Wi-Fi कॉलिंग हे कमकुवत नेटवर्क परिस्थितीमध्ये अतिशय उपयुक्त फिचर आहे.
  • Wi-Fi कॉलिंगमध्ये तुम्ही उच्च दर्जाच्या ऑडिओमध्ये बोलू शकता.
  • जर तुम्ही नेटवर्क नसलेल्या ठिकाणी असाल तर तुम्ही वाय-फाय कॉलिंग फीचरचा लाभ घेऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo