जगातील सर्वात लोकप्रिय ऍप Whatsapp नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नवीन उपयुक्त फीचर्ससह इम्प्रेस करण्याचं प्रयत्न करत असते. अशातच आता लोकप्रिय मेसेजिंग ऍपने एक नवीन खास आणि अप्रतिम फिचर WhatsApp मध्ये जोडला आहे. डेव्हलपर्सनी सोशल मेसेज ऍपमध्ये HD व्हीडिओ आणि फोटो पाठवण्यासाठी बहुप्रतिक्षित सपोर्ट जोडला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
पूर्वी हे ऍप 16MB पेक्षा कमी साईजच्या फोटोज आणि व्हिडिओ पाठवण्यापुरते मर्यादित होते, परंतु ही गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. कारण HD मीडियासाठी अधिकृत समर्थन युजर्ससाठी आणले गेले आहे. Whatsapp च्या बीटा आणि डेव्हलपर बिल्डद्वारे HD फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची सुविधा बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. हे आता सर्व OS आवृत्तीसाठी रोल आउट होत आहे.
– सर्वप्रथम तुमचे Whatsapp अपडेट केल्यानंतर अप्लिकेशन ओपन करा, तुम्हाला कोणाला HD दर्जाचे मीडिया पाठवायचे आहे त्यांचे संपर्क निवडा.
– नंतर टेक्स्ट एंट्री फील्डमधील इमेज आयकॉन वर टॅप करा.
– एक इमेज निवडा आणि नंतर स्क्रीनच्या टॉपवर नवीन HD चिन्ह दिसेल, त्यावर टॅप करा.
– आता तुम्हाला पाठवायचे असलेले रिझोल्यूशन स्टॅंडर्ड कॉलिटी किंवा हाय कॉलिटी निवडा. पर्याय फोटो रिझोल्यूशनबद्दल तपशील देखील दर्शवितो.
– मीडिया आणि गुणवत्ता निवडल्यानंतर फक्त 'सेंड' बटण टॅप करा.
Whatsapp HD फोटो आणि व्हिडीओ लेटेस्ट फीचर अनेक युजर्सना हे फीचर आधीच मिळाले आहे आणि काहींना ते येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात मिळेल. Whatsapp वर एचडी दर्जाचे मीडिया पाठवणे खूप सोपे आहे. तसेच, एचडी गुणवत्तेच्या फोटोज 18MB साईज ऑफर करतात. व्हिडिओ 480p ते 720p गुणवत्तेपर्यंत समर्थित असतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile