1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे पेमेंटवर लागेल चार्ज ? ग्राहकांच्या खिशावर पडणार का ताण ?

HIGHLIGHTS

1 एप्रिलपासून ग्राहकांच्या खिशावर येणार ताण ?

2,000 रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर लागेल चार्ज ?

UPI पेमेंट्स करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?

1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे पेमेंटवर लागेल चार्ज ? ग्राहकांच्या खिशावर पडणार का ताण ?

तुम्ही ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. 1 एप्रिलपासून Gpay, Phonepe, Paytm इत्यादी ऍप्सद्वारे पेमेंट करण्यासाठी चार्ज लागणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI द्वारे व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारण्याची सूचना केली आहे. Gpay, Phonepe किंवा Paytm सारख्या UPI ऍप्सद्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर हा सरचार्ज लावला जाणार आहे, अशी एक बातमी सर्वत्र पसरत आहे. मात्र, हे खरे नाही. त्यांच्याकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे NPCI ने स्पष्ट केले आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

खरं तर, यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारण्याचे प्रकरण एका Whatsapp मेसेजद्वारे लीक झाले होते. तो फेक मेसेज होता. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते, असे सांगण्यात आले. पण असे काहीही नाही त्यामुळे वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

 

 

ज्याप्रकारे खोट्या बातम्या पसरतात आणि UPI पेमेंटची संख्या वाढत आहे, त्याच वेगाने सायबर फसवणूकही वाढत आहे. या प्रकरणात आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

UPI पेमेंट्स करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी : 

– नेहमी लक्षात ठेवा की, पेमेंट प्राप्त करण्यासाठी UPI पिन आवश्यक नाही. अशा परिस्थितीत, जर कोणी तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि तुम्ही तुमचा UPI पिन शेअर केला असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

– जर तुम्ही एखाद्याला QR कोड किंवा फोन नंबरद्वारे पैसे देत असाल, तर तुम्ही कोड आणि नंबर ज्या व्यक्तीला बरोबर पेमेंट करायचे आहे त्या व्यक्तीचा आहे की नाही हे तपासावे. 

– कोणतीही रँडम आणि अज्ञात कलेक्ट रिक्वेस्ट स्वीकारू नका. 

– आजकाल फसवणुकीच्या अनेक केसेस फक्त QR कोड समोर येत आहेत. कधीकधी फसवणूक करणारे कोड बदलतात. यामुळे ज्याला द्यायचे आहे ते पेमेंट त्याच्याकडे जाण्याऐवजी दुसऱ्याकडे जाते. त्यामुळे QR कोड स्कॅन केल्यानंतर नाव देखील तपासा.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo