Holi WhatsApp Stickers: दूर बसलेल्या लोकांना ‘अशा’प्रकारे शुभेच्छा द्या, जाणून घ्या पद्धत

HIGHLIGHTS

होळीला दूर बसून आपल्या संपर्कांना सणाच्या शुभेच्छा द्या.

Holi WhatsApp Stickers ने प्रियजनांना शुभेच्छा देता येतील.

बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

Holi WhatsApp Stickers: दूर बसलेल्या लोकांना ‘अशा’प्रकारे शुभेच्छा द्या, जाणून घ्या पद्धत

होळीला तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांपासून दूर असाल तर काळजी करण्याची गरज नाही. यासाठी WhatsApp हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बहुतांश स्मार्टफोन वापरकर्ते हे मेसेजिंग ऍप वापरतात. ऍपवर अनेक क्रिएटिव्ह आणि मनोरंजक मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही होलिका दहन ते होळीपर्यंतच्या शुभेच्छा पाठवू शकता. या पद्धतींमध्ये स्टिकर्स, GIF आणि टेक्स्ट मॅसेज समाविष्ट आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : पूर्णपणे बदलले Vodafone Idea चे 2 प्लॅन्स, ग्राहकांसाठी आता अधिक डेटा उपलब्ध

होळी WhatsApp स्टिकर्स 

– सर्वप्रथम फोनवर WhatsApp ओपन करा. आता ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या चॅटवर जा.

– आता चॅटबॉक्सवर स्मायलीचा पर्याय निवडा.

– यानंतर स्टिकरचा पर्याय निवडा.

– होळी स्टिकर्ससाठी '+' वर क्लिक करा.

– येथे तुम्ही Google Play Store किंवा App Store वर उपलब्ध असलेल्या थर्ड पार्टी ऍपद्वारे स्टिकर्स जोडू शकता.

– आता Happy Holi स्टिकर्स शोधा आणि Add to WhatsApp चा पर्याय निवडा.

आता तुम्ही तुमच्या प्रियजनांना येथील आवडते स्टिकर्स पाठवून शुभेच्छा देऊ शकता. 

होळी WhatsApp Gifs 

– स्मार्टफोनवर WhatsApp उघडा. ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याचे चॅट ओपन करा.

– आता अटॅचमेंटवर जा आणि व्हिडिओवर टॅप करा.

– त्यानंतर गॅलरीमधून तुम्हाला GIF म्हणून पाठवायचा आहे तो व्हिडिओ निवडा.

– निवडलेल्या व्हिडिओचे पूर्वावलोकन व्हाट्सएप विंडोवर दिसेल, येथे व्हिडिओ टू GIF हा पर्याय निवडा.

– या प्रक्रियेनंतर निवडलेला व्हिडिओ GIF मध्ये रूपांतरित होईल.

आता हा GIF पाठवण्यासाठी सेंड बटणवर टॅप करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo