अगदी अलीकडे, JIO ने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio कंपनीचा एक रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत रिचार्ज केल्यास तुम्हाला नंबर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही. हा प्लॅन तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि डेटा बेनिफिट देखील देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळेल ते बघुयात…
Jio 899 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुम्हाला 336 दिवसांची वैधता ऑफर करतो. तरीही तुम्हाला यामध्ये 28 दिवसांचे 12 सर्कल मिळत आहेत. तुम्हाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात. तुम्हाला 28 दिवसांसाठी 2GB डेटा मिळेल. 12 महिन्यांत तुम्हाला एकूण 24GB डेटा दिला जाईल.
त्याबरोबरच, या रिचार्जवर तुम्हाला 50 SMS मिळतील, जरी तुम्हाला ते फक्त 28 दिवसांसाठी मिळतील. हे JIO चे सर्वाधिक विकले जाणारे रिचार्ज आहे. मात्र, हे लक्षात घ्या की, हा रिचार्ज प्लॅन फक्त JIO फोन वापरकर्त्यांसाठी आहे.
JIO च्या यादीत आणखी एक प्रीपेड प्लॅन आहे, ज्याची किंमत 155 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 2GB डेटा मिळेल. यात तुम्हाला अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल. त्यामुळे हा प्लॅन विकत घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी याचा सहज लाभ घेता येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile