Akshay Kumar : फ्लॉप हॅट्रिकनंतर अक्षयच्या ‘या’ चित्रपटाला IMDB वर मिळाले सर्वाधिक रेटिंग

HIGHLIGHTS

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटाला IMDBवर सर्वाधिक रेटिंग

अक्षयचे यावर्षी एकामागे एक तीन चित्रपट फ्लॉप

पुढील वर्षी अक्षय पाच चित्रपट घेऊन येणार आहे

Akshay Kumar : फ्लॉप हॅट्रिकनंतर अक्षयच्या ‘या’ चित्रपटाला IMDB वर मिळाले सर्वाधिक रेटिंग

अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष काही खास नव्हते. आधी बच्चन पांडे, नंतर सम्राट पृथ्वीराज आणि आता रक्षाबंधन या अभिनेत्याचे तीन बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, खचून न जाता 'रक्षा बंधन' रिलीज होऊन अवघ्या 22 दिवसांनी तो आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण, यावेळी तो चित्रपटगृहात नव्हे तर OTT प्लॅटफॉर्मवर सिनेप्रेमींना भेटला. अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे तो चौथा फ्लॉप चित्रपट देण्यापासून वाचला. खरं तर, 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट बनला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Realme चा पॉवरफुल फोन कमी किमतीत भारतात दाखल, 50MP कॅमेरासह मिळेल सर्वोत्तम डिस्प्ले

अक्षय कुमारच्या चित्रपटांचे रेटिंग

 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चार चित्रपटांपैकी कठपुतली चित्रपटाला IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. Disney+Hotstar वर प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 6.0 रेट केले गेले आहे. दरम्यान, 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट 10 पैकी 5.8 रेटिंगसह IMDb वर दुसऱ्या स्थानावर आहे. 10 पैकी 5.2 रेटिंगसह बच्चन पांडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत रक्षाबंधनला सर्वोत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. असे असूनही, त्याचे रेटिंग खूप कमी आहे. त्याला 10 पैकी 4.6 रेटिंग मिळाले आहे. 

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तीन फ्लॉप दिल्यानंतरही अक्षय कुमारचा वेग काही थांबत नाहीये. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पुढील वर्षी अभिनेत्याचे पाच चित्रपट असतील. ज्यात राम सेतू, OMG 2 – ओ माय गॉड! 2, सेल्फी, कॅप्सूल गिल, बडे मियाँ छोटे मियाँ आणि सूरराई पोत्रूचे हिंदी रिमेक रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. म्हणजेच 2023 मध्ये खिलाडी कुमार सहा चित्रपटांसह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo