महागड्या रिचार्जचा त्रास संपला! सुमारे 100 रुपयांमध्ये संपूर्ण महिनाभर सुरु राहील सिम, जाणून घ्या रिचार्ज प्लॅन्स

महागड्या रिचार्जचा त्रास संपला! सुमारे 100 रुपयांमध्ये संपूर्ण महिनाभर सुरु राहील सिम, जाणून घ्या रिचार्ज प्लॅन्स
HIGHLIGHTS

सुमारे 100 रुपयांमध्ये VI चे रिचार्ज प्लॅन्स

या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना 200MB डेटा मिळेल

VI चा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea, देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आपल्या ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी असे काही प्लॅन्स ऑफर करते, जे कमी किंमतीत दीर्घ वैधतेसह येतात. जे लोक त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी कमी किमतीचे प्लॅन शोधत आहेत, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स खूप खास आहेत. आज आम्ही तुम्हाला Vi च्या तीन प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे सिम सक्रिय आणि कमी बजेट असलेल्या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत.

हे सुद्धा वाचा : विराट कोहलीच्या हातात दिसला Vivo S15 Pro, पुढील महिन्यात Vivo V25 म्हणून भारतात होणार लाँच

VI 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea चा रु. 99 प्रीपेड प्लॅन कमी बजेट असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा प्लॅन  200MB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम समाविष्ट आहे. मात्र, यामध्ये SMS चा कोणताही फायदा नाही, परंतु वापरकर्ते नंबर पोर्ट करण्यासाठी SMS पाठवू शकतात.

Vi चा 107 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea च्या रु. 107 प्रीपेड प्लॅनचे 99 रु.च्या प्रीपेड प्लॅनसारखेच फायदे आहेत. केवळ वैधता आणि ऑफर केलेल्या एकूण टॉक टाइममध्ये फरक आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनसह 30 दिवसांची वैधता 107 रुपयांच्या टॉकटाइमसह मिळते. या प्लॅनसह Vi वापरकर्त्यांना 200MB डेटा देखील देते.

VI चा 111 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

111 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 200MB डेटा आणि 111 रुपयांचा टॉकटाइमसह येतो. या प्लॅनसह ऑफर केलेली एकूण वैधता 31 दिवसांची आहे. म्हणजेच या किमतीत तुमचे सिम 31 दिवस ऍक्टिव्ह असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo