Kofee with karan 7: कॅटरिनाने पतीसोबत शोमध्ये येण्यास दिला नकार, ‘या’ स्टारसोबत येणार विकी कौशल

HIGHLIGHTS

7 जुलैपासून रोजी कॉफी विथ करण सीझन 7 सुरू

शोमध्ये कॅटरिनाने पती विकिसोबत येण्यास दिला नकार

विकी कौशलसोबत सिद्धार्थ मल्होत्राला आमंत्रण

Kofee with karan 7: कॅटरिनाने पतीसोबत शोमध्ये येण्यास दिला नकार, ‘या’ स्टारसोबत येणार विकी कौशल

'कॉफी विथ करण'च्या 7व्या सीझनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफने करण जोहरच्या शोमध्ये पती आणि अभिनेता विकी कौशलसोबत येण्यास नकार दिला आहे. 7 जुलै रोजी कॉफी विथ करणचा सीझन 7 सुरू झाल्यानंतर होस्ट करण जोहर स्टुडिओमध्ये त्याच्या चॅट शोचा नवीन भाग रेकॉर्ड करत होता. जिथे त्याच्या शोच्या सोफ्यावर विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे दोन गेस्ट होते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : बजेटमध्ये स्मार्ट TV हवंय ? Amazonवर 'या' स्मार्ट TVवर मिळतेय प्रचंड सवलत, बघा यादी

कॅटरिना आणि विकी शोमध्ये एकत्र येणार नाहीत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरला विकी कौशल आणि त्याची पत्नी कॅटरिना कैफला एकत्र बोलवायचे होते. मात्र, कॅटरिनाने ही ऑफर नाकारली. यानंतर करणने त्याचा जुना विद्यार्थी आणि सध्याचा आघाडीचा अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्राला विकीसोबत शोमध्ये येण्यास आमंत्रण दिले. विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​एकमेकांना फारसे ओळखत नसले, तरी दोघे एकत्र आले तर हा एपिसोड खूपच मनोरंजक असेल.

कियाराचे नाव घेऊन सिद्धार्थला चिडवले

एपिसोडमध्ये, विकी कौशलला कॅटरिना कैफसोबतच्या त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी विचारण्यात आले. तसेच सिद्धार्थ मल्होत्राला अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण कियारा अडवाणीच्या नावाने चिडवले गेले. मात्र, सिद्धार्थ कियाराबद्दल फारसा बोलला नाही. 

शिवाय, दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढच्या वेळी सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेता ​​अजय देवगणसोबत 'थँक गॉड' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'योद्धा' नावाचा चित्रपटही आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ अभिनेत्री दिशा पटानीसोबत दिसणार आहे. तसेच, विकी कौशल लवकरच शशांक खेतानच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात भूमि पेडणेकर आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींसोबत दिसणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo