Asus च्या जबरदस्त गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग, 18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह मिळतील अनेक फीचर्स

HIGHLIGHTS

Asusचे दोन गेमिंग स्मार्टफोन आज होणार लाँच

लाँच इव्हेंट Asus इंडियाच्या YouTube चॅनेलवर थेट बघता येईल.

फोन चार्ज करण्यासाठी दोन USB Type-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध

Asus च्या जबरदस्त गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग, 18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह मिळतील अनेक फीचर्स

Asus आज भारतात Asus ROG Phone 6 सिरीज लॉन्च करणार आहे. या मालिकेअंतर्गत, ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro हे दोन स्मार्टफोन आणले जातील. ही एक गेमिंग स्मार्टफोन सीरीज असणार आहे. स्मार्टफोन जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आणले जात आहेत. स्मार्टफोन्सचे लॉन्चिंग भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.20 वाजता सुरू होईल. चला तर जाणून घेऊयात फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती… 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Airtel चा 912 GB डेटा प्लॅन बघितलं ? वर्षभराच्या वैधतेसह मिळेल अमर्यादित कॉल्स, मोफत हॉटस्टार सब्स्क्रिप्शन

Asus ROG Phone 6 ची अपेक्षित किंमत

Asus ROG Phone 6 ची भारतात किंमत 59,000 ते 65,000 रुपये असू शकते. तसेच, प्रो वेरिएंटची किंमत 79,000 ते 85,000 रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते. फोनसोबत काही गेमिंग अ‍ॅक्सेसरीजही येतील, ज्याचे पैसे वेगळे द्यावे लागतील. तुम्हाला लाँच इव्हेंट Asus इंडियाच्या YouTube चॅनेलवर थेट पाहता येईल.

18GB रॅम आणि 6000mAh बॅटरी

Asus ROG Phone 6 Geekbench, 3C आणि TENAA सारख्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले आहे. यावरून फोनच्या बहुतेक फीचर्सची कल्पना येते. सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. ROG फोन 6 मध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.78-इंच लांबीचा OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

फोनमध्ये 18GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज दिले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, 64MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा रिअर सेटअप दिला जाईल. फोनला 6,000mAh बॅटरी मिळेल, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन चार्ज करण्यासाठी दोन USB Type-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध असू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo