Coolpad Cool 20s : 50MP कॅमेरासह आकर्षक फोन, किंमत 12 हजार रुपयांपेक्षाही कमी

HIGHLIGHTS

Coolpad Cool 20s स्मार्टफोन बाजारात दाखल

नवीन स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षाही कमी

फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh ची बॅटरी उपलब्ध

Coolpad Cool 20s : 50MP कॅमेरासह आकर्षक फोन, किंमत 12 हजार रुपयांपेक्षाही कमी

स्मार्टफोनच्या जगात आणखी एका नवीन हँडसेटने प्रवेश केला आहे. या नवीन डिवाइसचे नाव Coolpad Cool 20s आहे. हा एक 5G रेडी स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन 4GB, 6GB आणि 8GB या तीन रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोन फक्त 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 999 युआन म्हणजेच सुमारे 11,600 रुपये आहे. या फोनची विक्री 17 जूनपासून सुरू होईल. Coolpad Cool 20s फायरफ्लाय ब्लॅक, मून शॅडो व्हाइट आणि अझर ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येतो. फोनमध्ये कंपनी 90Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा सह अनेक उत्तम फीचर्स देत आहे. चला तर जाणून घेऊयात फोनबद्दल सविस्तर तपशील… 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Coolpad Cool 20sचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये टियरड्रॉप नॉच डिझाइनसह 6.58-इंच फुल HD + LCD पॅनेल आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये लाँच केला आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी कूलपॅडच्या या नवीन फोनमध्ये LED फ्लॅशसह दोन कॅमेरे आहेत.

हे  सुद्धा वाचा: 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट लवकरच OTT वर रिलीज होणार! तोटा कमी करण्यासाठी निर्मात्यांची नवी योजना

मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे, ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 11 OS वर सर्वोत्तम कूल OS 2.0 वर काम करतो. साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, USB टाइप-C आणि कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo