बघा Jioचे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, ज्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म सब्स्क्रिप्शन मिळेल अगदी मोफत

बघा Jioचे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, ज्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म सब्स्क्रिप्शन मिळेल अगदी मोफत
HIGHLIGHTS

Jioचे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, ज्यामध्ये वर्षभर OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन मोफत.

Jioच्या इतर ऍप्सचे ऍक्सेस देखील मिळेल.

रिचार्ज प्लॅन्सची किंमत रु.499 पासून सुरू.

आजच्या युगात OTT ची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. हे एक मोठे कारण आहे, ज्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी OTT सबस्क्रिप्शन ऑफर करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही  OTT प्लॅटफॉर्मचा आनंद कोणत्याही व्यत्ययाशिवाय घेण्यासाठी रिचार्ज प्लान शोधत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या काही शानदार रिचार्ज प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्‍हाला Disney + Hotstar  सब्‍सक्रिप्शन मिळत आहे. या प्लॅन्सचे रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Disney + Hotstar प्लॅटफॉर्मवर क्रिकेट, चित्रपट आणि अनेक उत्कृष्ट टीव्ही शोचा आनंद घेता येईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दैनिक डेटा मर्यादेशिवाय इतर अनेक फायदे देखील मिळतील. चला तर जाणून घेऊयात या प्लॅन्सबाबत सविस्तर माहिती… 

499 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन

Jio च्या 499 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी Disney + Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन मिळत आहे. याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह तुम्हाला रोजच्या इंटरनेट वापरासाठी 2GB इंटरनेट डेटा देखील मिळतोय. याव्यतिरिक्त, तुम्हाला दररोज SMS पाठवण्यासाठी 100 SMS ची सुविधा देखील मिळेल. या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला Jio चे इतर ऍप्स जसे Jio Security, Jio TV, Jio Cinema चे ऍक्सेस देखील मिळेल. हा प्लॅन ​​एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.  

799 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन

जिओचा हा रिचार्ज प्लॅन एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला डिझनी + हॉटस्टारच्या एका वर्षाच्या मोबाइल सबस्क्रिप्शनचा आनंद घेता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS  पाठवण्याची सुविधाही मिळत आहे. त्याबरोबरच, हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जिओच्या इतर ऍप्सचे बेनिफिट देखील मिळतील. 

601 रुपयांचा Jioचा  रिचार्ज प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे 1 वर्षाचे मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये अतिरिक्त 6GB इंटरनेट डेटा देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 SMSची सुविधादेखील मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo