येत्या ऑक्टोबरपासून iPhoneवर WhatsApp काम करणार नाही, काय आहे कारण?

HIGHLIGHTS

या वर्षाच्या अखेरीस iPhoneवर WhatsApp काम करणार नाही.

WhatsApp सुरु ठेवण्यासाठी iOS 12 अपडेट करणे आवश्यक.

मात्र, आता iPhone 5 आणि iPhone 5C वर WhatsApp उपलब्ध होणार नाही.

येत्या ऑक्टोबरपासून iPhoneवर WhatsApp काम करणार नाही, काय आहे कारण?

Facebookच्या मालकीचे WhatsApp सर्वात लोकप्रिय आणि इन्स्टंट मेसेजिंग ऍप्सपैकी एक आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती WhatsApp वापरतो, मात्र काही iPhone युजर्ससाठी चिंताजनक बाब आहे. iOS 10 आणि iOS 11 वर चालणाऱ्या iPhonesमध्ये जसे की, iPhone 5 आणि iPhone 5Cमध्ये WhatsApp या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच शक्यतो येत्या ऑक्टोबरपर्यंत काम करणे थांबवेल. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त iOS 12 आणि केव् केवळ नवीन व्हर्जन WhatsAppला सपोर्ट करेल. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती…

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

iPhoneच्या पुढील वर्जनवर WhatsApp काम करणार नाही

iOS 10 आणि iOS 11 वर WhatsApp वापरणाऱ्या युजर्सना मॅसेजिंग ऍप वापरणे सुरू ठेवण्यासाठी iOS 12 अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्हाला अजूनही iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6s वर WhatsApp वापरता येईल, परंतु तुम्हाला iOS च्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असल्यास, तुमचा फोन व्हॉट्सऍप वापरण्यासाठी OS 4.1 किंवा लेटेस्ट असायला हवा.

आगामी काळात 'या' iPhoneवरही WhatsApp बंद होण्याची शक्यता 

मात्र, आता iPhone 5 आणि iPhone 5C वर WhatsApp उपलब्ध होणार नाही. कारण iOS 12 या iPhonesसह कंपिटेबल नाही. WWDC 2022 काही आठवड्यांनंतर येणार आहे आणि त्यादरम्यान Apple iOS 16ची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा देखील केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, iOS 16 iPhone 6s आणि iPhone 6s Plus वर काम करणे थांबवेल.

WhatsApp वर येणार नवीन फीचर्स 

इन्स्टंट मॅसेजिंग ऍप WhatsApp ने नवीन फीचर्स जारी केले आहेत. त्याबरोबरच काही अपडेट्सवर काम देखील सुरु आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍपने इमोजी रिऍक्शन आणले आहेत. तसेच, स्टेटस अपडेट्ससाठी रिच लिंक प्रिव्ह्यूवर काम सुरु आहे. रिच लिंक फीचर्स व्युव्हर्सना लिंकबद्दल अधिक माहिती देईल, जी युजर्सना खूप सोयी प्रदान करेल. सध्या काही फीचर्सची iOS ऍपवर टेस्टिंग केली जात आहे. हे अपडेट लवकरच Android आणि डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo