अनलिमिटेड कॉलिंगसह VIचे नवीन इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन लाँच, किंमत 599 रुपयांपासून सुरू

HIGHLIGHTS

अनलिमिटेड कॉलिंग डेटासह VIचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन लाँच.

किंमत केवळ 599 रुपयांपासून सुरु.

नवीन प्लॅनमध्ये ऑलवेज ऑन फिचर देखील समाविष्ट.

अनलिमिटेड कॉलिंगसह VIचे नवीन इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन लाँच, किंमत 599 रुपयांपासून सुरू

VI म्हणजेच Vodafone Ideaने सोमवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय अमर्यादित रोमिंग पॅक लाँच केले आहे. Vi इंटरनॅशनल रोमिंग पॅकची किंमत 599 रुपयांपासून ते  5,999 रुपयांपर्यंत आहे. UAE, UK, US, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि ब्राझील यांसारख्या देशांमध्ये प्रवास करणारे ग्राहक या प्लॅनची निवड करू शकतात. हे पैक या देशांमध्ये रोमिंग नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सपोर्ट आणि डेटा देतात. त्याबरोबरच, VI पोस्टपेड रोमिंग पैक ऑलवेज ऑन फिचरसह येतात. ज्यामुळे सब्सक्राइबर प्लॅन संपल्यानंतरही ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारले जाणार नाही. चला तर मग याबाबत  सविस्तरपणे जाणून घेऊयात…. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

VI इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची किंमत 

VIने आपल्या ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग पैकची नवीन रेंज लाँच केली. Vi इंटरनॅशनल रोमिंग पैक 599 रुपयांपासून ते  5,999 रुपयांपर्यंत आहेत. 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता चोवीस तासांची आहे. तसेच 5,999 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांची वैधतेसह येतो. सर्व पैक अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा लाभ देतात.

ऑलवेज ऑन फिचर

सध्या, Vi लोकल सर्व्हिस प्रोव्हायडर्ससह 81 देशांमध्ये रोमिंग सेवा देत आहे. सबस्क्राइबर प्लॅन संपल्यानंतरही ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारले जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी VIने ऑलवेज ऑन फिचर देखील सादर केले आहे. उदाहरणार्थ, ज्या प्रवाशांनी सात दिवसांच्या वैधतेसह Vi पोस्टपेड रोमिंग पैकचे सबस्बक्रिप्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांना परत पुढे प्रवास सुरू ठेवायचा असेल तर ते व्हॉइस कॉलिंग, SMS आणि डेटासाठी वापरणे सुरू ठेवू शकतात. 

महत्त्वाचे म्हणजे यासाठी युजर्सकडून स्टॅंडर्ड रेट आकारले जातील. मात्र, युजरचे बिल 599 रुपयांपर्यंत असेल, केवळ तोपर्यंत हे स्टॅंडर्ड रेट लागू असतील. त्यानंतर ही मर्यादा ओलांडल्यावर युजर्सना प्रत्येक दिवसासाठी 599 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, Vi च्या RedX पोस्टपेड प्लॅनचे ग्राहक दर वर्षी 2,999 रुपयांच्या सात दिवसांसाठी वैध असलेल्या Vi इंटरनॅशनल रोमिंग फ्री पैकसह आंतरराष्ट्रीय प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo