Jio, Airtel आणि VI यांसारख्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यानी मागील वर्षी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना प्रीपेड प्लॅन्ससाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले. मात्र, आता परत एकदा सामान्य माणसाला महागाईचा फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या यावर्षी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात…
Survey
✅ Thank you for completing the survey!
2016 पूर्वी देशात अनेक टेलिकॉम कंपन्या होत्या, पण त्या कंपन्यांचे प्लॅन स्वस्त किंवा सामान्य ग्राहकांना परवडणारे नव्हते. 2016 मध्ये जिओच्या आगमनानंतर क्रांतीच झाली आणि अचानक फ्री डेटा प्लॅन्स, फ्री कॉलिंगचा महापूर आला. जिओने फ्री डेटा प्लॅन्स आणि फ्री कॉलिंगचा बेनिफिट दिल्यामुळे सामान्य ग्राहकांना अगदी खुश करून टाकले. त्यामुळे, त्याकाळी जिओची सिम प्रत्येकाकडे असल्याचे बघायला मिळत होते. फ्री सर्व्हिसेसमुळे जिओचे मार्केट खूप वाढले होते.
त्यानंतर Jio पाठोपाठ Airtel आणि Vodafone-Idea ने देखील ग्राहकांना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. मात्र, आता फ्री चे मार्केट संपत चालले आहे. टेलिकॉम कंपन्या दरवर्षी त्यांच्या प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ करत आहेत, त्यामुळे लवकरच सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन पूर्वीसारखेच महागडे होतील अशी शक्यता नाकारता येत नाही.
अहवालानुसार Jio, Airtel आणि VI यांसारख्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या यावर्षी दिवाळीपर्यंत त्यांचे प्री-पेड प्लॅन 10% ते 12%पर्यंत महाग करू शकतात. म्हणजेच जर एखाद्या प्लॅनची किंमत 100 रुपये असेल तर त्याची किंमत रु. 110 ते 112 पर्यंत वाढणार आहे. टेलकॉम कंपन्यांना या महागड्या दर योजनेचा लाभ होणार, त्यांचा ऍव्हरेज रेव्हेन्यू प्रति युझर (ARPU) 10% वाढेल, असे म्हटले जात आहे. या वाढीनंतर, Airtel, Jio आणि Vi चे ARPU अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये होईल.
Jio 'या' ग्राहकांना चार दिवस मोफत डेटा देत आहे –
जिओने आपल्या आसाममधील ग्राहकांना चार दिवस मोफत डेटा आणि SMSसह दररोज 1.5GB डेटा देण्याची घोषणा केली आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानंतर जिओने हा निर्णय घेतला आहे. आसाममधील दिमा हासाओ, कार्बी आंग्लॉन्ग ईस्ट, कार्बी आंग्लॉन्ग वेस्ट, होजई आणि कचार यासह अनेक जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना रिलायन्स जिओकडून एक मोफत योजना मिळेल जी चार दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा प्रदान करेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile