हॅक झाली नाही IRCTC ची वेबसाइट, IRCTC ने केले खंडन

हॅक झाली नाही  IRCTC ची वेबसाइट, IRCTC ने केले खंडन
HIGHLIGHTS

काही वेळापूर्वी अशी बातमी माध्यमांद्वारे सांगितली जात होती, की जवळपास १ करोड प्रवाशांचा डाटा IRCTC च्या ई-तिकिट पोर्टलवर हॅक करुन चोरी केला गेला आहे. मात्र आता IRCTC ह्या बातमीचे खंडन केले आहे.

काही तासांपूर्वीच अशी बातमी येत होती की, जवळपास १ करोड प्रवाशांचा डाटा IRCTC च्या ई-तिकिट पोर्टलवर हॅक करुन चोरी केला गेला आहे. ह्या बातमीमुळे सर्व प्रवाशांमध्ये आपल्या डाटा सुरक्षेच्या प्रश्नामुळे चिंतेंचे वातावरण पसरले होते. मात्र आता IRCTC ने ह्या बातमीचे खंडन करत सांगितले आहे की, मिडियाचे  सर्व रिपोर्ट्स चुकीचे आहेत आणि असं काहीही घडलेलं नाही. ही माहिती IRCTC चे PRO संदिप दत्ता यांनी दिली आहे.  तसेच एक उच्चस्तरीय समिती ह्याचा अधिक तपासणी करत असल्याचेही त्यांनी सांगितलय.

काही वेळापूर्वी अशी बातमी येत होती की , IRCTC वेबसाइट जेथे लाखो करोडो लोकांचे खाजगी माहिती जसे की, पॅनकार्ड नंबर, घरचा पत्ता ह्यांचा वापर करुन ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंग करतात. हे सर्व डिटेल्स हॅक केले गेले आहेत आणि ह्या सर्व अफवांना मिडियाने नको तितकेच प्रकाशित केले.

हेदेखील पाहा- पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

तसेच असेही ऐकण्यात येत होते की, रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे की, “काही लोक ह्या डाटाचा चुकीचा वापर देखील करु शकतात.” त्यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

त्यावर IRCTC ने पुर्णपणे खंडन केले आहे आणि सांगितले आहे की, मिडियाद्वारे सांगितली गेलेली माहिती एकदम चुकीची आहे, ते असे करुन प्रवाशांची केवळ दिशाभूल करत आहे. असे काहीही झालेले नाही आणि आमच्या प्रवाशांची सर्व खाजगी माहिती सुरक्षित आहे, त्याला कोणीही हॅक केलेले नाही. आणि IRCTC ही हॅक झालेली नाही. तसेच महाराष्ट्र सरकारलाही हा संबंधी सखोल चौकशी करण्याचे मागणी केल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

हेदेखील वाचा – हुआवे G9 लाइट स्मार्टफोन आणि मिडियापॅड M2 7.0 टॅबलेट लाँच
हेदेखील वाचा – 
केवळ ९९० रुपयात मिळतोय सॅमसंग गियर VR

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo